Skip to main content

मुक्तक

माझ्या मनातले राऊळ

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 20/05/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
(विचारतरंग जसे उमटलेत तसे मांडलेत. कदाचित विस्कळित वाटतील. पण त्यांच्यातील सच्चाई समजून घ्यावी! ) देऊळ म्हटलं की आपल्या किती ठराविक संकल्पना असतात, नाही? जे जे उदात्त, उत्तम असते त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे मंदिर - देऊळ. पंचमहाभूतांना मानवी संकल्पनेत बंदिस्त करून त्या द्वारे संपन्न अनुभव व आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान मानले जाते देऊळ. पण कितीतरी वेळा आपण अशा अनुभवाला काही छोट्यामोठ्या कारणांनी पारखे होतो. कधी ते कारण गर्दी असते, तर कधी त्या ठिकाणची अस्वच्छता. कधी भक्तीचा बाजार आपल्याला उबग आणतो तर कधी लोकांच्या अंधश्रद्धा! आणि मग ज्या कारणासाठी देवळात गेलो ते कारणच बाजूला पडते.

मृगजळ

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 17/05/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
लवचिक अंतर जरी निरंतर,हळवे आपुले नाते ख़ास, जवळ येईना दूर जाईना, तरी सुखावे खोटा भास. भासामागे धावत जाता, मनात हीरवळ पायी आग, बेधुंदित ना दाह जाणवे, स्वप्नी राहो नकोच जाग! अशी बंधने हलके धागे, वार्‍यावरती फिरती विरती, कधी हव्याश्या कधी नकोशा, गाठी त्याला आपसुक पडती, नसता गुंता - ओढातान, अडकत जाते आपली मान, तुला दुखावे मला दुखावे, असे मोकळे अंतर छान! अनामिक हे भाव असुदे, अनाम असता अर्थ अपार, अस्फुट राहो गुज मनीचे, का द्यावा शब्दांना भार, तुला कळावे मला कळावे, असो वेगळा अर्थ तयांस, कुरवाळु हे मृगजळ र्‍हदयी, सत्याहुनही सुखद भासं...

डुडुळगावचा गोलंदाज

लेखक शरदिनी यांनी रविवार, 16/05/2010 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नी निवडू धुडूम्म गाज डुडुळगावचा गोलंदाज तोराबोरा ओमरसामा काय ललाटी ओ ओ मामा गोलाबारी सुसूत्र ताडन रुजुवातीला करूण धावन शोषण भीषण पोषण वेसण धवल गिटारी कडकड मंथन तित्तिरबाला ग्रंथीलाला ग्रसनी जिव्हा कुरूप भोला यमनाला घालू तेलघडा हाका बिचारी मुकी चिडा
काव्यरस

तुम्हांला हे आठवतयं

लेखक chintamani1969 यांनी गुरुवार, 13/05/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याच जुन्या आठवणी आपल्याल्या आणि आपल्या मूडला फ्रेश करतात आणि मग ...... आपल्या कामाला फ्रेश तो दूरदर्शनचा गोल गोल फिरणारा लोगो दूरदर्शनचाच तो पट्ट्या पट्ट्या चा स्क्रीन सेव्हर ....

मानसिक छळ्/हिंसा

लेखक पुरणपोळी यांनी गुरुवार, 13/05/2010 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
काहि काहि लोक दुसर्यांना दुखावण्यात पी एच डी असतात. माझ्या जवळ्च्या ओळखितली ( नातेवाईकच) बाई.. मी फ्लट घेतला आणि ही बघायाला आली ( न बोलावता). दारात पाउल टाकल्या टाकल्या हिचे उद्गार,, " येवढा काहि वाईट नाहि.. बरा आहे. तरी सुदधा ह्या एरियात म्हणजे जरा.." आता हि बाप आणि नवरा पुण्याईमुळे एका विवि़क्षित शहरातल्या विषेश उपनगरात रहाते. पण येवढा माज? कुठलीहि गोष्ट घेतली आणि हिनि पाहिलि कि हिचा प्रश्न, केव्ढ्याला? किमती वरुन प्रत्येक गोष्टिची किंमत करते. मी गाडि घेतली तेव्हा हीचा येवढा जळफळाट झाला, मुळ स्वभावाप्रमाणे तीने लगेच रंगावर टिका केली.

'सामन्या'तून 'सामान्यां'कडे...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 06/05/2010 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
एक नवा विक्रम होतोय. कारण, मास्टरब्लास्टर 'ट्विटर'वर आलाय. काल सचिनने ट्विटिंग सुरू केले, आणि त्याच्या लाखो 'फॅन्स'मध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या. त्याच्या फॉलोअर्सचा क्षणाक्षणाला वाढत जाणारा आकडा न्याहाळणे, हेदेखील कालचे मोठ्ठे 'सुख' होते. संध्याकाळपर्यंतच्या जेमतेम १८ तासांत सचिनच्या चाहत्यांची झुंबड गर्दी ट्विटरवर उसळली होती.

मनातले थोडेसे..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 05/05/2010 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
९ मे २०१०. खूप मोठा दिवस. का?? नेमके काय आणि कोणत्या शब्दांत सांगावे समजत नाही. स्वप्नं असतात म्हणून जगण्याला दिशा असते असं म्हंटलं चुकीचं ठरू नये. कधी स्वप्नं खरी होतात, तर कधी घडून गेलेलं काहीतरी, हे आपलं स्वप्नं होतं का असा विचार आपण करू लागतो. आज मागे वळून पाहताना असा विचार येतो की, ४ वर्षापूर्वी मी कोण होते? पुणे आकाशवाणीच्या मराठी चॅनेल ची निवेदिका होते. कार्यक्रमाची संहिता लिहिताना खरडलेल्या चार ओळी, कधी एखादी कविता, आणि त्या अनुषंगाने येणारं निवेदन.. साहित्यिक लेखानाचा इतकाच काय तो संबंध! आणि आज माझ्या नावावर एक कविता संग्रह प्रकाशित होतो आहे.

हे जीवन सुंदर आहे!!!!!

लेखक सांजसखी यांनी बुधवार, 05/05/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एक वसंतातली पहाट ... खिडकीतून येणारी थंड, मंद, सुखद वार्‍याची झुळुक गात्रास हलकेच स्पर्श करून जात होती..थोड्याच वेळात तमाचा पडदा सरला अन त्या झुळुकेने जाग आली.... सर्वांग खूपच हलके वाटू लागल्रे..अचानक अंथरूणाचा तिटकारा उत्पन्न झाला... उठ्ले.. शांत गॅलरीत उभारले.. खाली रस्ताही शांत .. वेळ पहाटे ५ वाजले असतील कदाचित... तुरळ्क व्यायामप्रेमी रस्ता कापत होते... एका द्रुष्टिक्षेपात नजर स्थिरावली ती गॅलरीतल्या नुकत्याच लावलेल्या गुलाबाच्या रोपावर..

माझी व लाखों-करोडोंची लाईफलाईन......

लेखक भानस यांनी बुधवार, 05/05/2010 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
तिला प्रथम कधी बरं पाहिलं होतं मी...... आई सांगते त्यानुसार जेमतेम वर्षाची असेन. दादर ते अंधेरी हा नेहमीचा प्रवास. मामा अंधेरीला राहायचा नं. तेव्हांपासून ती माझी व मी तिची झालेली. गेल्या जन्माचे माहीत नाही पण या जन्माचे ऋणानुबंध नक्कीच होते. आम्ही ठाण्याला शिफ्ट होऊन दोन-तीनच महिने झाले होते. स्कूटर स्टॅंडला लावतानाच ८.५३ आज तिनावर येतेय हे ऐकताच मी नवऱ्याला टाटा करून पळत सुटले. ब्रिजवरून उतरतानाच लोकल आलीही त्यामुळे रोजचा डबा सोडाच पण पुढचा फस्टही गाठणे केवळ अशक्य असल्याने समोरच असलेला महिलांचा सेकंडचा डबा चटदिशी पकडला. दहा सेकंदाच्या चलबिचलीमुळे इतके जीव खाऊन धावूनही माझी गाडी सुटणार होती.