खरं तर एवढयातच पुन्हा लिवायचा काही विचार नव्हता. पण "धमु" शी खवखवता "सुशि"चा विषय निघाला, आणि खपली निघाली..
सुशिंना मी पहिल्यांदा केव्हा वाचला, आठवत नाही. पण "शॅबी" हा शब्द मी उगाचच्या उगाच वापरायचो, कारण तो "येता.. जाता" मध्ये वाचला होता. पिसाट हसलो होतो हि कादंबरी वाचुन..
खरंच काय रेंज होती ना या माणसाची स्साली ?
हृद्य पिळवटुन घ्यायचंय, वाचा मग दुनियादारी, कल्पान्त, क्षितिज, दास्तान, झूम...
हृद्याला भोकं पाडून घ्यावीशी वाटतंय? उचला जाई, तलखी, दास्तान, मधुचंद्र, स्वीकार, तलाश, देवकी पैकी कुठलीही..
कोवळ्या प्रेमाची हळुवार फुंकर हवीय, घ्या मग बरसात चांदण्यांची, तुकडा तुकडा चंद्र, कोवळीक वगैरे..
सामाजिक वगैरे हवीय, आहे ना प्रतिकार, कळप आणि बर्याच इतर..
कोर्ट-रूम ड्रामा हवा असेल तर अमर विश्वास हाजीर हो..
थरार/ सस्पेंस हवा असेल तर मंदार एन्ड गँग आहे, फिरोज इराणी आहे.
घाबरायचंय का तुम्हाला, या सैतानघरात. धुकं-धु़कं, मरणोत्तर, समथिंग, माध्यम आहेतच की..
एवढ्यावरच कुठं थकता राव? नुसता टगेपणा हवा असेल, तर "जाता येता" खंडाळा लोणावळा करुन या, नाहीतर "जन पळभर" च्या पहील्या भागात जाऊन जरा आळंदीला पळुन लग्न कशी लावतात हे तर बघा.. ऐतिहासिक भानगडीतले असाल तर, "जमीन-आस्मान" "रुपमती" ला भेटा कि जरा.. आणि हया कादंबर्यातले "लँग्वेज एक्सपेरिमेंटेशन"ही बघा जरा अनुभवून.. बाकीही बरीच यादी आहे अजून...
"देवाघरची फुले" (गोष्ट) वाचुन बघा. निरीक्षण निरीक्षण काय असतं ते कळेल..
आणि एवढं झाल्यावरही तहान भागली नसेल, तर ह्या अचाट माणसाच्या कविता वाचून बघा !!
स्साला एवढी वर्सॅटॅलिटी जर कुण्या विंग्रजी लिवणार्याकडे असती ना तर लोकं डोक्यावर घेऊन नागडी नाचली अस्ती त्याला.. पण आम्ही साले कर्मदरीद्री.. अरे, नुस्त्या खटल्यांच्या भरवशावर पानं खरडणारे तुम्हाला संमेलनाध्यक्ष म्हणुन चालतात आनी आमच्या सुशिंना "नुस्ते लोकप्रिय" म्हणून अनुल्लेखानी मारणार तुम्ही, भडव्यो !?
सुशिंना मी बर्याच आधी वाचलं. कॉलेजमध्ये असतांना पारयणं केली. नंतरच्या धबगड्यात हे वेड जरा मागे पडलं, पण कॉलेजात असतांना मी एका वहीत एकीकडे सुशिंची पुस्तकं (इश्यु केलेली) लिहित असे आणि बाकी सगळ्यांची दुसरीकडे, पण सुशिंचं परड्म नेहमीच जड होतं.
एकदा मी लायब्ररीतून सुशिंच्या तीन कादंबर्या संध्याकाळी इश्यु करून नेल्या आणि रात्रभरात वाचून पुन्हा आणखी घ्यायला सक्काळी लायब्ररीत गेलो. तिथली बाई बोलली, "तू ह्या सगळ्या पुर्ण वाचल्या !?"
मी बोललो," हो, पुर्ण वाचल्या."
ती बोलली ,"झोपला नाहीस का?"
मी बोललो ," झोपलो की थोडा."
तिला विश्वासच बसेना. म्हणे "नक्की"??
मी पुन्हा हो म्हणालो..
शेवटी ती बोलली, "कमाल आहे !!"
........... त्या वेडीला काय ठाऊक, कुणाची आणि किती कमाल आहे ते?.. जाने दो, दिवाना ही जाने दिवाने की हालत....!
वाचन संख्या
16547
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुनियादारी ... लैई भारी
आमी बी फिदा हाय..
In reply to दुनियादारी ... लैई भारी by आपला आभि
सामाजिक वगैरे हवीय, आहे ना
मीक
आमेन
In reply to मीक by सन्जोप राव
आणखी काही
In reply to आमेन by आजानुकर्ण
आयला!
In reply to आणखी काही by मी_ओंकार
भा पो
छ्या मोठ्या अपेक्षेने
सुशि.
सुशि आवडत नाही?
In reply to सुशि. by चतुरंग
चूक!
In reply to सुशि आवडत नाही? by योगी९००
ओ भौ..
In reply to सुशि आवडत नाही? by योगी९००
गदगदलो....
In reply to ओ भौ.. by धमाल मुलगा
बाकी शुन्य ...
In reply to ओ भौ.. by धमाल मुलगा
अग्गायायायायाया.... हवं तर
In reply to बाकी शुन्य ... by छोटा डॉन
धमाल मुलगा
In reply to ओ भौ.. by धमाल मुलगा
कदाचित. नक्की ठाऊक नाही कारण
In reply to धमाल मुलगा by Pain
>> द माँक हु सोल्ड हिज फेरारी
In reply to कदाचित. नक्की ठाऊक नाही कारण by धमाल मुलगा
मस्त मस्त
In reply to ओ भौ.. by धमाल मुलगा
धम्याकाका जाव दे रे... न्हान
In reply to ओ भौ.. by धमाल मुलगा
मलाही दुनियादारी नाही आवडलं
In reply to सुशि आवडत नाही? by योगी९००
रंगा अन् खामा.. मला पण घ्या
In reply to सुशि आवडत नाही? by योगी९००
माझ्या अत्यंत
घरात आठवडाभर हाच विषय सुरु
सुहास शिरवळकर - माझाही आवडता
मान्य....
@संदिप..
ह्महम... सुशिंना त्यांचा एक
>>शिवाय ते 'काळा पहाड' वाले
In reply to ह्महम... सुशिंना त्यांचा एक by विंजिनेर
___/\___ सुंदर लेखन. मात्र एक
पराशी १००% सहमत अगदी
In reply to ___/\___ सुंदर लेखन. मात्र एक by परिकथेतील राजकुमार
लेख मस्त काळजातुन आला आहे
समांतर
शं. ना च्या एका कथा संग्रहात
In reply to समांतर by अमोल मेंढे
अरे भौ...
येता- जाता
येता .. जाता. नाही
In reply to येता- जाता by गणेशा
सुशींची पुस्तके उत्तम स्थीतीत
मला सुशि म्हटल्यावर
सुशि ............. आमचेही
त्यांचे पुर्ण नाव काय? म्हणजे
सुहास शिरवळकर (त्यांच्या
In reply to त्यांचे पुर्ण नाव काय? म्हणजे by शिल्पा ब
हातिच्चा...... मला वाटलं मस्त
थॅंक्स...
च्यायल्ला!
आँ !!
In reply to च्यायल्ला! by धमाल मुलगा
अरे भौ..
In reply to आँ !! by सुहास..
आमचा पास..! सुशिंनी लिहिलेलं
तेव्हा तेव्हा सुशि
सुशि. माझेदेखील आवडते लेखक
सुहास शिरवळकर - माझेही आवडते
वा:! हा काय प्रश्न झाला का
In reply to सुहास शिरवळकर - माझेही आवडते by कच्चा पापड पक्…
यकच नंबर ले़ख मित्रा!! मी पण
प्रतिसादाच्या मानानं जास्तच
जादूभरे दिवस
ज्जे ब्बात विसुनाना! मस्त.
In reply to जादूभरे दिवस by विसुनाना
असेच म्हणतो..
In reply to ज्जे ब्बात विसुनाना! मस्त. by धमाल मुलगा
मस्त प्रतिसाद.
In reply to जादूभरे दिवस by विसुनाना
सुरेख प्रतिसाद!
In reply to जादूभरे दिवस by विसुनाना
तुमचा हेवा वाटतो
In reply to जादूभरे दिवस by विसुनाना
+१
In reply to तुमचा हेवा वाटतो by माजगावकर
दुसर्याच क्षणाला बॅ. अमर
बरोबर...
In reply to दुसर्याच क्षणाला बॅ. अमर by नगरीनिरंजन
@नगरीनिरंजन..... एवढ्या
In reply to दुसर्याच क्षणाला बॅ. अमर by नगरीनिरंजन
सुशि
या धाग्यावर उल्लेख केलेली
"सुशि"... बास्सं. आणखी काय !?