तू हात पुढे जो केला
मी दिला त्यास आधार
समजून फोड तळहाती
हळुवारपणे जपणार
वचनास पाळण्याचा
केला पक्का निर्धार
चाललीस सप्तपदी तू
मी कधी न अंतरणार
शंकेस कधी तो थारा
तू मनात ना देणार
जोडीची गोडि गुलाबी
ही सदैव दिसणार
तू कामावरून येता
तव स्वागत मी करणार
कप हाती गरम चहाचा
बिस्किटासवे देणार
तारीख एक ती येता
मी खूष अती होणार
तव पगार माझ्या हाती-
मी तुजभवती फिरणार
...स्वप्नातहि असले भलते
तू आणु नको कुविचार -
जा सांग तुझ्या बापाला
मी घरजावई ना होणार !
ती केबी-फोरची संधी
मी नाही दवडणार
करोडपती बनण्याची
मी स्वप्ने बघणार !!
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1665
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
तारीख एक ती येता मी खूष अती
हम्म
हा.. हा .. मजेशीर. कविता आवडली.
घरजावई!!
In reply to हा.. हा .. मजेशीर. कविता आवडली. by दत्ता काळे