Skip to main content

मुक्तक

शाळेतल्या गमतीजमती

लेखक रमणरमा यांनी शनिवार, 30/10/2010 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
फिश् पॉंड ( जमल एकदाच ) आम्ही लहान असताना शाळेत दोन मुलांच्या मधे एक मुलगी किंवा उलटे ( उलटे म्हणजे तसे उलटे नाही हो वाइस वर्सा सारखे उलटे ) बसवायचे. कधी कधी मज्जा यायची पण कधी कधी जेव्हा शेजारचा मुलगा मूलीना हेट करणारा असायचा तेव्हा चांगली जुन्पय्चि. मग बदला घ्यायला एकमेकाना द्वेष पत्रे ( इकडे खरडी पाठवतात म्हणे ) पाठवायचो. ज्या वयात प्रेम पत्रे पाठवायची त्या वयात आम्ही जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल हे बघायचो. प्रेम पत्रे पाठवणारे नग सुद्धा होते पण त्यांच्या बद्दल नंतर कधी तरी. त्यातून मग दुसर्‍याचा अगदी कमित कमी शब्दात अपमान करण्याचे नवे नवे प्रकार शोधले जायचे.

पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !

लेखक मितान यांनी बुधवार, 27/10/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज टपाल बघत होते. दोन बँकेची पत्रं, एक वीज बिल, ५ जाहिरातींची पत्रं ! सगळी छापील ! माझे नाव पत्ता पण ! किती दिवस झाले बरं हस्ताक्षरातला स्वतःचा पत्ता वाचून ? पत्र या माध्यमाने भारलेले दिवस आठवले. जेव्हा मी एका सामाजिक संघटनेचे काम करत असे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं असायची. आणि तिकडे जाऊन आल्यानंतर पत्रांचे पूर. साधारण १२ वर्षांपूर्वीच्या त्या पत्रांमधली वाक्य आजही काळवेळ न पाहाता डोक्यात घुमतात. " मायाताई, तुझी खूप आठवण येते गं, शाळा छान चालू आहे, तुझ्या आईबाबाना नमस्कार " " मायडे, भोसला मिलिटरी स्कूल ने बोलावलंय, जाऊया नं? " " वादळात भरकटणार्‍यांना कोणतीच दिशा नसते.

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

बाबा झाल्यावर....

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 26/10/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा माझे पिल्लू ३ वर्षे १० महिन्यांचे आहे, कधी अड़ते कधी पड़ते. कधी त्याला समजावतो कधी रागावतो. हे त्याच्या वागन्या पेक्षा माझ्या मूड वर जास्त अवलंबून असते. नंतर उगाच विचार करतो बाबा पण असेच काही करायचे ना. लहानपणी मी एकदा घरात काहीतरी माझ्या मनासारखे झाले नाही म्हणून चिडून बसलो होतो आणि मग घर सोडायला निघालो होतो, फकत बाबांची वाट पाहत होतो. अशासाठी की बाबा येउन माझा प्रश्न सोडवू शकतील अशी आशा होती. बाबा आले शालेतुन आणि घराबाहेर पाय-यावर बसून माझ्या बरोबर बोलत होते १० च मिनिटे.

एम - २२

लेखक मस्तानी यांनी मंगळवार, 26/10/2010 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
एम २२ हे एका रस्त्याचं नाव आहे. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातला ११६ मैलांचा एक रस्ता. या हेमंत ऋतूमध्ये ज्याचा भाव भलताच वधारतो असा हा एक रस्ता. ऐकून होतो काल-परवा पर्यंत पण आता मात्र प्रत्यक्ष अनुभव घेवून आलोय की या एका रस्त्याबद्दल इतकं का बोललं जात. आठवड्याभराची काम संपवून शुक्रवारी रात्री मुलाच्या स्काउट पथकाबरोबर आयोजित कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकी कोजागिरीची रात्र त्यामुळे चंद्र असा काही दिसत होता की वाह !

आता उरल्यात फक्त तुझ्या आठवणी,

लेखक अज्ञात यांनी रविवार, 24/10/2010 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
आता उरल्यात फक्त तुझ्या आठवणी, खिडकीतून येणाऱ्या कवडश्यात समोर टेबलावर दिसतो तो तांब्या आणि त्यावर उपडं ठेवलेलं फुलपात्र, पूर्ण खोलीभर पसरलेला तो रातराणीचा सुगंध, टेबलाच्या पायापाशी पडलेलं ते वर्तमानपत्र. रेदिओ वर लागलेलं ते मुकेशचं गाणं "जाऊन कहा बताये दिल...." पूर्ण खोलीभर व्यापलेला अंधार ज्याच्या कुशीत संध्याकाळचा उन हळू हळू निजू पाहताय, आणि तो आपला पदर मायेना त्याच्या अंगावर पास्राव्तोय, खुद्ची एकसारखी लयीत मागेपुढे होतेय आणि हळूच येणाऱ्या वार्याच्या झुळकीने तुझ्या फोटोवरचा चंदनाचा हार हलतोय... .... आता... आता फक्त उरल्यात तुझ्या आठवणी....

तारूण्य

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 22/10/2010 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
तारूण्य सळसळतं, जोमदार, उत्साहाने परीपूर्ण असतं नव्हे ते तसच असलं पाहीजे. वार्‍याने भरलेलं शीडाचं तारू पूर्ण जोमाने आपल्या ध्येयपूर्तीकडे निघावं तसं काहीसं. "हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे" या ओळी तारूण्याला चपखल लागू पदतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण - जे जे काही चांगले ते ते या काळात वाट्याला येते. स्वप्न, ध्येय, महत्त्वाकांक्षा यांची लयलूट म्हणजे तारूण्याचा सोनेरी ऋतू. जगाच्या शाळेत नुकतच पाऊल टाकलेलं असतं. दुर्दम्य आशावाद मी मी म्हणत असतो. प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो.

देव देव्हार्‍यात नाही!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 20/10/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी ऑफिसातून कधी नव्हे ते लवकर घरी आलो होतो. मनस्वीला देवी दाखवायला नेण्याचं कबूल केलं होतं. रात्री नऊला घरातून बाहेर पडलो. ती थोडीशी झोपाळली होती, पण देवी बघायला जाण्याचं सोडवत नव्हतं. सर्वांत आधी बंगाली दुर्गा पाहण्यासाठी कॉंग्रेस भवन गाठलं. तुफान गर्दी होती, पण देवी पाहता आली. माझ्यासमोर डझनभर तरुण-तरुणी, प्रौढ-प्रौढा हातातले मोबाईल सरसावून देवीची छबी आणि शूटिंग टिपण्यात गुंतले होते. फ्रेम ऍडजस्ट करून देवीचा चेहरा बरोबर मध्यभागी कसा येईल, याचे प्रयत्न सुरू होते. मला हसावं की रडावं कळेना. गणपतीतही हेच दृृश्‍य सगळीकडे पाहायला मिळतं. लोक उठसूट कसलेही फोटो मोबाईलमध्ये घेऊन काय साध्य करतात?

ए देवबाप्पा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/10/2010 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
ए देवबप्पा ऐकू येते का रे काही तुला त्या आरतीच्या गोंगाटात टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात लोक काय काय मागत असतात अन गार्‍हाणी सांगत असतात कुणाला काय हवे असते रुपं देही धनं देही पुत्रं देही सर्व कामांशा देही मे गात असतात किती ते तुझे गोडवे अन म्हणतात की जो गाईल ही आरती मिळेल त्याला सर्व हवे ते पण खरे सांग एकदा खरेच ऐकु येते का रे तुला? सांग ना..... ए देवबप्पा दिसते कारे काही तुला गाभार्‍याच्या बाहेरचे त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे त्या रोषणाईच्या झगमगटात? किती डोळे लागलेले असतात आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात ताटकळत उभे असतात दर्शनासाठी तुझ्यावर केलेल्या रो