मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोक्याला शॉट

चाफा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"हॅलो, बीएसएनएल का ? " " हो, बोला " " अहो ब्रॉडबँड बंद पडलेय " " तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे" " का हो ? " " टेक्निकल प्रॉब्लेम" खाSSड फोन बंद ***** " हॅलो, बीएसएनएल ? " " दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं अडलीयेत " " काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे" " नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ? " " एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात " " काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू व्हायला ? " " काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ जाणारच " खाSSड फोन बंद ***** "हॅलो बीएसएनएल ?" " बोला " " तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना " " हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी " " मी तुमची काही मदत करू शकतो का ? " " तुम्ही टेलिकॉम वाले का हो ? " " नाही, पण मी थोडं सुचवू शकतो " " सांगा की साहेब " " तुम्ही ना ! चार-पाच मांजरी पाळा वाटल्यास मी एक देतो.... फुकटात " खाSSड फोन बंद ***** "हॅलो बीएसएनएल ? " " बोला " " अहो मघाशी फोन केलेला मी ते मांजरीचं तेवढं ..." " अहो साहेब कशाला मस्करी करता ? मांजरी पाळल्यानं काय होणार आहे ? " " अहो त्या उंदीर खातील ना ! त्या काही केबल खात नाहीत " " आणि मग मांजरी बाहेर कशा काढायच्या ? " " कुत्रे देतो ना दोन, चांगले गलेलठ्ठ " "च्यायला...... "खाSSड फोन बंद ***** " हॅलो बीएसएनएल ? " " हे बघा तुम्हीपण मांजर पाळायचे सल्ले देणार असाल तर.... " " नाही हो, कुणी दिला होता का असला सल्ला ? " " नायतर काय साहेब, इथे आमची हालत झालेय आणि लोकांना मस्करी सुचते" " तुम्ही सध्या काय प्रोटेक्शन घेताय ? " " आँ, कसलं ओ कसलं ? " " अहो एक्स्चेंज साठी म्हणतोय मी " " चालू आहेत प्रयत्न " " मी सर्व्हिस देऊ का ? " " काय करता आपण ? टेलिकॉम मध्ये आहात का ? " " नाही हो, सर्पमित्र आहे " खाSSड फोन बंद ***** " हॅलो बीएसएनएल का ? " " तुम्हीपण सर्पमित्र आहात का ? " " का ? तुम्ही आहात ? " " नाही हो, मघाशी कुणीतरी त्रास देत होतं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ? " " अहो नेट बंद आहे गेले चार दिवस " " एक्सचेंजमध्ये उंदरांनी वायर चावल्यानं बंद पडलंय ते, काम चालू आहे" " पण मी काय म्हणतो, " " बोला " " तुम्ही केबलना उंदराचं औषध लावून ठेवा म्हणजे बघा की उंदीर पडलेला असेल तिथेच शोधायची केबल " " तुम्ही तेच कालचे का हो ? " " नाही मी उंदीर मारायचं औषध विकतो एकदम जहाल आहे बघा उंदीर फूटभर पण लांब जाऊ शकत नाही " " ....... " खाSSड फोन बंद ***** " हॅलो बीएसएनएल ? " " नेट चालू झालेय " " मी विचारत होतो तुमच्याकडे एखादी कादंबरी किंवा डीव्हीडी आहे का हो ? " " हे टेलिफोन एक्सचेंज आहे लायब्ररी नाही " " नाही त्याचं काय आहे ते नेट ..... " " सांगितलं ना चालू झालंय " " हो तेच ते पण ते किंचित स्लो आहे, मला एक मेल पाठवायचंय तर ते लिहून पूर्णं होईपर्यंत तेवढाच टाईमपास एखादी कादंबरी वाचून झाली असती हो " " आयची.... " ***** " हॅलो बीएसएनएल ? " " आता नेट व्यवस्थित चालू आहे " " ते माहीताय मला पण.. " " पण काय ? " " तेवढा उंदीर सापडला का ते विचारायचं होतं " हल्ली म्हणे बीएसएनएल त्या कॉलरला शोधतायत म्हणे, त्याचं कनेक्शन बंद करण्यासाठी. मला भीती नाही मी बरेच जणांचे फोन वापरलेत.

वाचने 11601 वाचनखूण प्रतिक्रिया 50

मी-सौरभ 16/05/2012 - 09:52
आईच्ची जय .... खरच डोक्याला शॉट लावलात. कमीत कमी आधी डीसक्लेमर तर टाका. :) तुमचं हलक फुलक लिखाण आपल्याला तर लै आवडतं ब्वा!!

प्रास 16/05/2012 - 10:03
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ! लई भारी लिवलंय..... मजा आली वाचताना.... चाफाराव, एकदम झकास!

उदय के'सागर 16/05/2012 - 10:39
येक नंबर. :D खरंच हे सरकारी, सेमी-सरकारी पब्लीक-सर्वंट्स लई माज करतात फोन वर... म्हणजे नेहमी न सांगताच फोन 'आदळतात'....(शेवटी सर्वंट्सच ते, त्यांना काय 'मॅनर्स' असणार :P)

In reply to by उदय के'सागर

मृत्युन्जय 16/05/2012 - 11:54
हॅ हॅ हॅ. खाजगी क्षेत्रातले उच्चविद्याविभुषित लोक देखील असेच ऐकुन न घेता फोन आपटतात. २ मिनिटापुर्वीच असा अनुभव घेतलेला असल्याने वाक्य लगेच खोडुन काढावेसे वाटल्याबद्दल क्षमस्व :)

sagarpdy 16/05/2012 - 11:41
" हो तेच ते पण ते किंचित स्लो आहे, मला एक मेल पाठवायचंय तर ते लिहून पूर्णं होईपर्यंत तेवढाच टाईमपास एखादी कादंबरी वाचून झाली असती हो "
भले शाब्बास!

Ravindra 16/05/2012 - 12:03
अति सुंदर. अगदी असचं करण्याची इच्छा होते.

" हॅलो बीएसएनएल का ? " " तुम्हीपण सर्पमित्र आहात का ? " " का ? तुम्ही आहात ? " >>> मेलोय हो हसुन हसुन. शेजारच बेन म्हने काय झाल बे ? आता त्याला काय सान्गु कप्पाळळळ ???

स्वातीविशु 16/05/2012 - 13:10
ह.ह.पु.वा. लावलीत हो चाफाकाका. अप्रतिम ......... त्यांच्या डोक्याला पुरता शॉट्ट्च लावला की.... ;)
" तुम्ही ना ! चार-पाच मांजरी पाळा वाटल्यास मी एक देतो.... फुकटात "
वाचल्यानंतर हसू आवरणे जमलेच नाही. :)

५० फक्त 16/05/2012 - 15:37
मेलो खपलो तिच्यायला काय चाललंय हे ? उंदरं काय, मांजरं काय कुत्रे काय, अरे ते बिएसएनएल आहे का कात्रजचं प्राणि संग्रहालय ? अजुन थोडे दिवस फोन नेट बंद असतं तर पार डायनॉसर पर्यंत गेला असता.

मन१ 16/05/2012 - 19:49
गोळी आहे काय हसू दाबायची एखादी. बॉस भुताकडे बघावं तसं हसून खाली पडणार्‍या मला पाहतोय.