आर्ट ऑफ लिव्हिंग
वेळ : आणीबाणीची
काळ : प्यायला उठलेला
स्थळ : जागतिक खंड्या पक्षी पालक श्री श्री विजु भौ
आपल्या भव्य राज प्रासादात चकरा मारताना
विजु भौ : ए कोण आहे का रे तिकडे ???? इकडे आमचा ग्लास रिकामा झाला तरी कोणाच लक्ष नाही. खंड्या ग्लास भर माझा जरा, श्या आजकाल बियर पण गोड लागत नाहिये....
खंड्या : ओ बाबा ते नाही जमणार आता!!!!
विजु भौ : (बुचकळ्यात पडून) का म्हणून ??? का म्हणून नाही जमणार, हाय रे दैवा काय आमच नशीब
ज्यांना आम्ही मोठ करण्यासाठी दिवसाची रात्र करू खस्ता खाल्ल्या.
जिथे पाण्याची बियर करून समस्त तहानलेल्या जनतेची तृष्णा भागवली ते हे दिवस पाहण्यासाठी. अरे हेच का ते अच्छे दिन.
मिसळपाव