लेखकराजूयांनी बुधवार, 30/03/2016 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
'डॉक्टर,आजकाल झोप व्यवस्थित होत नाही.जेवण जात नाही दिवसभर नुसते डोके दुखत राहते.'
'बरं पोट निट साफ होते का?'
'नाही ना डॉक्टर.'
'मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या पण त्या अगोदर १५ दिवस रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधी अगोदर आणि नाष्टा झाल्यावर दैनंदिन कामाला सुरुवात करे पर्यंत दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायचे दिवसभरात असा निवांत वेळ मिळाला कि १५ दिवस हा प्रकार करायचाच आहे हे लक्षात ठेवा.'
' डॉक्टर याने काय होईल?'
'मी ते १५ दिवसानंतर सांगतो ओके.
आणि महत्वाची सूचना देतो यात अजिबात कंटाळा करायचा नाही कारण यानंतरच आपल्याला सर्व टेस्ट करा
लेखकएच्टूओयांनी बुधवार, 30/03/2016 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी कोणीतरी फेकलेला दगड
डोक्याला लागून झालेली जखम दाखवण्यासाठी
मी डॉक्टरकडे गेल्यावर
अचानकच वाढला माझा मेंदू गाठोड्याएवढा
खदाखदा हसला डॉक्टर
आणि बाहेर घेऊन गेला मला
तोपर्यंत वाढला मेंदू अवाढव्य
जोमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये
हवा भरलेल्या फुग्यासारखा
आभाळभर मेंदूच-
लिबलिबित मासाचा सुरकुत्यांसकट
तरीही जड वाटेना मला.
लेखकराजूयांनी मंगळवार, 29/03/2016 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
ती उजव्या हाताला वळाली आणि थोडे पुढे येताच जसजसा मेन रोडवरील लाईटचा प्रकाश अंधुक होऊ लागला तसे गडद होत जाणाऱ्या अंधाराने आणि थंडीने तिला आज अमावस्या असल्याची जाणीव झाली आणि तिची पावले आता झपझप पडू लागली.
काळ्याकुट्ट अंधारातून कुडकुडत चालताना आपल्या मागून कोणीतरी येत आहे असा तिला भास झाला पण मागे वळून पहायचे तिने टाळले.आपले दोन्ही हात आपल्याच शरीराशी घट्ट पकडत ती थंडीची तिव्रता कमी करायचा प्रयत्न करू लागली तिला जिथे जायचे होते त्या ठिकाणाचे अंतर जसजसे कमी होऊ लागले तसे तिला आपल्या मागे नक्कीच कोणीतरी आहे असे वाटू लागले नव्हे आता कोणाची तरी चाहूल तिला लागली आणि आता तिचा जीव भीतीने खालीवर होऊ ल
संदर्भ फक्त चालीसाठी आणि गाभा हेतु: मिपावर पुन्हा पुन्हा प्रवेश करणार्या आणि मिपावर दंग्यासाठी ठरावीक आयडीने येणार्या महाभागांना हा भाग समर्पीत आहे
( हल्ली मिपावर वावर आहे ‘एक्स्पर्ट(?) टॉकर’चा! अशीच एक टॉकर येतो ‘डु आय्डी बनून’.
जुन्या आय्डीने बदल्यासाठी नवी कोरी डु आयडी सलामत! मग काय?
जुन्या आय्डीची 'फुकाची घालमेल'. नव्या डु आय्डीची 'उत्साही सुरर्सुरी.
पण, त्या जुन्या आयडीला काय बरे सांगायचे असावे?
लेखकनाखुयांनी मंगळवार, 22/03/2016 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
उंच गुढीतच तपशीलाची गाठी
सकस धाग्यात अनाचे दोडोबा..
संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट
न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा..
विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत
संदर्भाचा तर खजिना अबाबा...
धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो
प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा
मालोजींकडे जातो घेऊन साथी
शिवकालीन चीजा आणि शिवबा..
त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार
चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा..
जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा)
प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा ..
.........
लेखकबहुगुणीयांनी मंगळवार, 22/03/2016 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
हे लिखाण पर-प्रकाशितच. कुणी अनामिकाने* लिहिल्यानंतर WhatsApp वर आलेल्या एका स्फुटाला मुक्तकाचं रुप द्यावंसं वाटलं, दिलं.
काय घेतलं, काय राहिलं?
पर्स, फोन, किल्ल्या हाती
आई निघे पोटासाठी
पगार मिळेल हातात
कसे यावे शब्द ओठी
'सगळं घेतलंय दिवसासाठी',
तान्हं बाळ घरात!
लेखकविदेशयांनी सोमवार, 21/03/2016 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू
वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू
वाटही पाहून झाली काळ तो सरला किती
ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू
झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी
का कधी शंका न आली मारली मज थाप तू
प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही
जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू
जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे
मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू ..
.
लेखकनाखुयांनी शुक्रवार, 18/03/2016 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे सम्जता कोण तुम्ही स्वतःला ?" असला प्रश्न तू मिपाकर साहित्यीकांना विचारतोस. अरे असें विचारावं कसं वाटल तुला. फार धाडसी रे बुवा तू.अरे मिसा होणे म्हणजे काय गुट़का खायची गोष्ट वाटली काय तुला? उघडली पुडी लावली तोंडाला. आँ म्हणे काय समजता स्वतःला.
लेखकसुबोध खरेयांनी गुरुवार, 17/03/2016 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा --४
मागच्या चार भागात आपण पाहिले कि वजन का वाढ्ते? adipostat म्हणजे काय आणि
वजन थोडे कमी होऊन परत का वाढते?
यात एक मूळ विचार मी अंतर्भूत करू इच्छितो कि कोणते अन्न आहे ज्याने वजन पटकन वाढते.
आपल्याला २४ तास उर्जेची गरज भासत असते आणि हि उर्जा ग्लुकोज जाळून मिळवली जाते. आपल्या मेंदूला चोवीस तास ग्लुकोज चा पुरवठा लागतो मग तो जागा असो कि झोपेत. झोपेत मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेळी कार्यरत होत असतात.