नववर्षाभिनंदन
आज माझ्या मनाच्या कोपरयात एक पुस्तक सापडल. बरीच धूळ साठली होती त्यावर. जरा झटकल्यावर कळालं की मागच्या वर्षाच्या आठवणींच पुस्तक होतं ते..
गेल्या वर्षापासुन माझ्याही नकळत मी हे लिहित होतो. कोणतेही शब्द नाहीत.स्थळकाळाचे ,भाषेचे बंधंन नाही .आहेत त्या फक्त आठवणी.आता निवांत बसुन त्या फक्त वाचायच्या आहेत. अलकद ते पुस्तक अनुभवायला लागलो. अशी पुस्तक वाचायची थोडी असतात ती अनुभवयाची असतात.
पुस्तकाची काही पान पुसट झाली होती..काहीं अर्धवट .काही चक्क फाटलेली.काही माझ्याच डोळ्यांनी भिजलेली. काही वेळासाठी ते आघात करुन गेलेले क्षण समोर आले.
मिसळपाव