"नारिता" एयरपोर्ट वर एजंट माझ्या नावाची पाटी घेऊनच उभा होता त्यामुळे त्याला ओळखण सोप्प गेल. मी त्याला माझी ओळख पटवून दिली आणि "तुडतुड्या" चालीने त्याने माझ्या ब्यागा उचलल्या आणि पूर्णपणे आम्ही एयरपोर्ट च्या बाहेर. ताबडतोब त्याने योकोहामा पोर्ट ला जायला ट्याक्सी बुक केली आणि पाच मिनिटात ट्याक्सी हजर. पटापटा त्याने ट्याक्सीत सामान ठेवलं आणि ट्याक्सीचा पुढचा दरवाजा उघडून माझ्या स्वागतार्थ वाकून वाकून त्यांच्या पद्धतीने नमस्कार केला.मला तर पूर्ण पणे गडबडायला झाल. तो इतका वाकून वाकून मला नमस्कार करत होता तर आता आपण पण त्याच्या समोर असाच वाकून वाकूनच नमस्कार करायचा का? असा विचार करण्यातच माझी दोन -पाच सेकंद गेली खरी पण कुठल्याही प्रकारे न वाकता मी भारतीय पद्धतीने नमस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि ट्याक्सीत ड्रायव्हर शेजारी बसले ( म्हणजे त्याचाच शेजारी) कारण ड्रायव्हिंग तोच करणार होता. रात्रीची बारा-साडे बारा वाजले होते.खर तर दिवसभराच्या दगदगीने झोप येत होती पण तरीही डोळे उघडे ठेऊन विस्फारून म्हणा हव तर ) टोकियो सिटीचे गुळगुळीत रस्ते न्याहाळत होते.
मध्येच त्याने मला विचारलं " नरिता" एयरपोर्ट ते "योकोहामा" पोर्ट चा अंतर किती आहे माहित आहे का तुला ? आत्ता मला कस माहित असणार? काहीतरीच प्रश्न :) त्याने अगदी मोठ्या तोर्यात सांगितलं खूप आहे अंतर आणि एवढ अंतर मी तुला ड्राइव्ह करून नेत आहे.म्हणजे काहीतरी खूप मोठ्ठ करत आहे असा त्याचा सूर वाटला. मनात म्हटलं मी काय करणार? ते तुझ कामच आहे.गाडीत त्याने मंद आवाजात मुझिक लावलं होत.ते कानाला प्रचंड सुखद वाटत होत. खर पेंग येत होती पण जागी राहण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होता .
शेवटी शांतपणे २ ते ३ तासाचा प्रवास करून एकदाचे आम्ही योकोहामा पोर्ट वर पोचलो.पोर्ट चे सगळे सोपस्कार पार पाडून त्याने शिप च्या ग्यानग्वेवरून माझ्या दोन्ही ब्यागा दोन्ही हातात घेऊन जी काही पळायला सुरवात केली त्याला तोडच नाही. त्याला गाठता गाठता मला नाकी नऊ आली. अरे हळू हळू पण तो ऐकतोय कुठे ? मला तरी त्याच्या बरोबरीने अगदी एवढी धावायची आणि पळायची जरुरी होती का? पण नाही. मी पण मुर्खासारखी धावतेय त्याच्या बरोबरीने. आत्ता पर्यत माझी अशी फरफट कोणीच केली नसेल. ( हाहाहा ) . शेवटी एकदाचे पोचलो जहाजावर आणि मला क्याप्टन च्या केबिन मध्ये शिप वरच्या क्याप्टन च्या हाती सोपून कुठलीही उसंत न घेता उद्या सकाळी व्हिसाच्या कामाला जायचंय तयार राहा म्हणून सांगून हा ज्या वेगानी आला त्याच वेगानी पसार :)
वाचने
3179
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
टांगा पल्टी घोडं फरार!
सुरुवात चांगली
मालिका आहे का?
लिखाण आवडलं.अजून मोठा भाग
काहीतरी कमी पडलंय यात...
पूर्णपणे म्हणजे सगळ्या
In reply to काहीतरी कमी पडलंय यात... by असंका
लेख आवडला.
वेगानी पसार झालात तुम्ही तर..
बुलेट ट्रेन
क्रमशः
In reply to बुलेट ट्रेन by सुनील
कदाचीत
In reply to क्रमशः by प्रदीप
हे काय होते?
बरं मग ?
जव्हेरगंज मग काहीच नाही :)
In reply to बरं मग ? by जव्हेरगंज
मालिका नाहीये. अनुभव. असेच
अरे काय!