"घे गरमागरम चहा.थोड्यावेळाने पोहे करते गरमागरम."
"काय झालं? यांनी तरी दिला का सकारात्मक प्रतिसाद?"
"कळवतो म्हणाले."
"हात्तिच्या.म्हणजे नेहमीसारखंच."
"हो नेहमीसारखंच.तुम्हाला बरं वाटलं ना?"
"विवेक किती चिडतोस? नीट बोल त्यांच्याशी"
"कशाला? आण्णामहाराजांची टेप ऐकायला?"
"अरे! तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे,सुटायला अवघड आहे म्हणून सांगतात ना ते?"
"काय सांगतात? आण्णामहाराजांची पोथी वाच, त्यांच्या समाधीवर डोकं टेकून ये हे सांगतात? त्यानं काय होणारेय?"
"अरे! तीन महिने झाले नोकरी शोधतोयस तू.मिळत नाहीये.वाचलास काही महिने अध्याय, टेकलंस डोकं समाधीवर आणि मिळाली हवी तशी नोकरी तर?