Skip to main content

मांडणी

अवघाचि संसार - कल्याण आणि इतरत्र

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 30/10/2021 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा अवघाचि संसार - कल्याण अवघाचि संसार- पुन्हा कल्याण रामचन्द्र आणि हरभट कल्याणात पावते झाले आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

अवघाचि संसार- पुन्हा कल्याण

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 24/10/2021 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा अवघाचि संसार - कल्याण जांभूळपाड्यात राहण्यात आता काहीच अर्थ राहिला नव्हता कारण मुळात गावाचा आणि गावकऱ्यांचाच पत्ता नव्हता तर राहणार कुठे आणि करणार काय?

अवघाचि संसार - कल्याण

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 20/10/2021 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा रामचा निरोप घेऊन मजल दरमजल करीत हरभट हिंदळ्यात पावते झाले तेव्हा एक नवीनच समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली होती. त्यांच्या अपरोक्ष गोंद्याने जोर करून त्यांच्या अर्ध्या बागेचा ताबा घेतला होता. तात्पुरते कुंपण वगैरे घातले होते.

अवघाचि संसार- जांभुळपाडा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 16/10/2021 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ हरभटांनी अलिबागला जायला बोट पकडली. इतक्या दिवसांनी मुलाला भेटायला जाणार म्हणून भागीरथीबाईंनी त्यांच्या सामानात काय काय जिन्नस भरून दिले होते. खरेतर हरभटांच्या कपड्याची एकच पडशी होती आणि बाकीचे सामान सगळे रामसाठी दिलेल्या वस्तूंनीच भरून गेले होते. खरेतर भागीरथीबाईंना स्वतः च रामला भेटायची फार इच्छा होती, पण घराच्या सगळ्या रागाड्यातून त्यांचा पाय कुठे निघायला ?

अवघाचि संसार- हिंदळे-२

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 13/10/2021 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
यथावकाश सरस्वतीचे बाळंतपण होऊन तिला एक गोड मुलगा झाला आणि कावेरीचेही सणवार आटोपून ती हरकूळला परतली. सड्यावरच्या जमिनीचा व्यवहार झाल्याने थोडके पैसे मिळाले त्यामुळे सर्व यथासांग पार पडले. बघता बघता वर्ष संपत आले. यावर्षी पीकपाणी ठीकठाक झाले होते.वरुण राजाने कृपा केली होती त्यामुळे सगळीकडे अगदी आबादी आबाद नव्हे पण समाधानकारक परिस्थिती होती. हरभटांची शेती गावातल्याच कुळांना खण्डाने कसायला दिली होती .त्याचे ४-५ पोती भात दसऱ्याला घरपोच आले असल्याने वर्षभराची बेगमी झाली होती. कोकणी माणसाला असे लागतेच काय? दोन वेळच्या जेवणात भात ,कधीतरी भाकरी.

अवघाचि संसार-हिंदळे

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 11/10/2021 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
अहो ऐकलंत का? नुकतीच घरच्या देवाची पूजाअर्चा करून , ग्राम दैवत असलेल्या कालभैरवाच्या देवळात जाण्यासाठी तयार होत असलेल्या हरभटांना पत्नी भागीरथी बाइंची हाक कानी आली.नुकते कुठे झुंजू मुंजु झाले होते. सगळीकडे शांतता होती. नाही म्हणायला गोठयातल्या गायींच्या गळ्यातील बारीक घुंगरांचा, विहिरीवरील पाणी शेंदायचा, कोंबडा आरवल्याचा, रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या बैल गाडीच्या चाकांचा ,असे काही परिचित आवाज येत होते. पण हिंदळ्यासारख्या गावंढ्या गावात असून असून वर्दळ ती कितीशी असणार? कोकणातल्या कोणत्याही गावासारखे एक साधे सुधे गाव. समुद्र किनारा थोडका लांबच , त्या पेक्षा खाडी जवळ.

प्रोपगंडा (Propaganda)

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 09/10/2021 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
a {text-decoration:none;} body { font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size: 16px; } .quoted {font-size: 16px;}

प्रोपगंडा (Propaganda)