Skip to main content

कविता

पुन्हा नव्याने..

लेखक उमेश मुरुमकार यांनी मंगळवार, 17/07/2018 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच रात्री जातात तुला आठवत आठवत.. आणि बसतो त्या बेहिशिबि अश्रूंना साठवत.. हिशोब करतो त्याच बेहिशिबि रात्रींचा ज्या तुला कधी तरी मिठीत घेतल्याची जाणीव ... करून देतात .. तू मांडलेल्या प्रस्तावाचा विचारदेखील केला कि पुन्हा नव्याने एक सुरुवात करू पण अजूनही हृदयाचे ठोके वाढत बसतात परत त्याच विचारात कि शेवट देखील पदरी येईलच पुन्हा नव्याने.. रुद्र (उमेश)

आगळा अनुराग

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/07/2018 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आगळा अनुराग रान हिरवे लाजलेले लाजल्या त्या रानवेली निर्झराला जाग आली मेघ आले सांजवेळी कोणता तो जलद वेडा भिजवुनी गेला धरेला वृक्षगर्भी ओज आले तेज हिरव्या कांकणाला अंबरावर रेखिली आरक्त नक्षी गूलबक्षी अन नभाच्या लाजण्याला रक्तवर्णी सुर्य साक्षी एक रस्ता कोरडासा खेळला त्या पावसाशी पावले तेथे कळ्यांची नाचली पाण्यात खाशी साजरी झाली धरित्री लेवुनी बेबंध वारा वाहले रस यौवनाचे पावसाची बनुन धारा रात्र गरती होतसे मग जाहले आरक्त डोळे आगळा अनुराग जागे बरसती ते मेघ ओले © विशाल कुलकर्णी
काव्यरस

असाव कोणीतरी

लेखक तृप्ति २३ यांनी रविवार, 08/07/2018 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात कोणाची तरी साथ असणं खूप गरजेचं असत म्हणून कोणीतरी आपल्यासोबत कायम असाव त्याच वर्णन मी या कवितेत केल आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता. https://www.truptiskavita.com

मेघ बरसला

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 07/07/2018 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी.
काव्यरस

मेघ बरसला

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 07/07/2018 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी.
काव्यरस

काही लिहिण्यापुरती

लेखक मनमेघ यांनी शुक्रवार, 29/06/2018 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
काही वाक्यांपुरतेच तिचे माझे संभाषण पाडी घण हृदयात आत आत काही शब्दांपुरताच तिचा माझा स्नेहबंध मी सबंध असतोही नसतोही काही अर्थांपुरतेच तिचे माझे नाते गूढ जशी ओढ नकळती खळाळती काही लिहिण्यापुरती तिची माझी पाटी कोरी आणि सरी उराउरी अक्षरांच्या ! ~ मनमेघ

वाया गेलेली कविता

लेखक कहर यांनी गुरुवार, 28/06/2018 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रहर चालला तो दुपारचा त्यातून घन आलेले दाटून दमट जराशी हवा पसरली लपाछपी खेळतसे ऊन दूर कुठे तो बसून रावा घालीत होता किर किर शीळ उदास होते आयुष्य झाले सरता सरेना आजची वेळ अशाच वेळी बसून एकटा हळूच असे तो निरखत तिजला एक भेंडोळे एक लेखणी होता हाती घेऊन बसला काही अंतरावर ती होती घागर बुडवीत पाण्यामध्ये रेखीव काया लवचिक बांधा वर्ण गोमटा कपडे साधे तिला ना होती जाणीव त्याची गुणगुणतसे आपल्या तंद्रीत आडोशास तो बसला होता काही खोडीत काही लिहीत घागर भरुनी ती निघताना याची लेखणी थांबे पुरी शीळ घालुनी तिज तो बोले तुजवर लिहिले हे वाच सुंदरी निघे गुलाब मग खिशातुनी जशी ती एकेक ओळ वाचता जरा थांबुनी मग ती वद

तेव्हा माघार घ्यावी....

लेखक Patil 00 यांनी मंगळवार, 26/06/2018 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
तेव्हा माघार घ्यावी.... जेव्हा आपलंच माणूस अनोळखी होतं ... तेव्हा... शांतपणे माघार घ्यावी....... जेव्हा संपतात सारी नाती काही सकारणं... अन काही विनाकारण.... तेव्हा पुरावे मागू नयेत नाती संपण्याचे..

मिरगाचो पाउस

लेखक Patil 00 यांनी सोमवार, 25/06/2018 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिरगाचो पाऊस -मालवणी कविता मिरगाचो पाऊस इलो चाग्लो वाजत गाजत। विजो कडाडले नी ढगांचो गडगडाटय झालो।।१।। तरी मिया म्हणतंय नायकाचो बाबलो गायब ख्य झालो। वाटच पावसाची बगी होतो तेंनीच माझो कोम्बो पळवलो।।२।। गावात कायव होयना माझ्या कोंबड्यार सगळ्याचो डोळो। फाटकी येव शिरा पडो मेल्यार बोलवोन हाडा लगेचच त्येका।।३।। येवदे त्येका चांगलेच गाळयोे घालतेय। सांगोती नी वडे घराकडे पोचोवक सांगतंय।।४।।

युगधंर

लेखक Patil 00 यांनी सोमवार, 25/06/2018 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
युगधंर-कविता- रास रंगे गोपिकांसवे गोपाळा कृष्ण कान्हा धन्य धन्य ती मथुरा पावा वाजवीतो कान्हा गाई चारीशी वनावनात संगे तुझ्या सुदामा गोपिकांसवे खेळखेळता तू युगधंर मी सुदामा दह्या दुधाचे हांडे रचवीशी तू एकक अडवूनी गोपिकांचे खोड्या तुझ्या अनेक तुझ्यासवे खुशीत साऱ्या सदैव मोहवी त्यांना युगधंर तू युगायुगांचा हवाहवासा असे त्यांना हाती घेऊन सुदर्शन धडा शिकवी गुन्हेगारास तरी शंभर आकडे मोजुन करशी सावध अन्यायास धावून येशी सहाय्याला परी हाकेस द्रौपदीच्या पुरवून वस्त्र द्रौपदीला फजिती उडवी दुर्योधनाच्या
काव्यरस