मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऊपदेश

शाली · · जे न देखे रवी...
समस्त सासरे मंडळींसाठी- पोटी आल्या कन्येचा l योगे पिता ही ग्रहदशा भोगे l जामाताशी उपसर्गही न पोचे l तो तर दशमग्रह ll घेणं नास्ति, देणं नास्ति l त्या नाम जामात असती l अहोरात्र एकच ही पुस्ती l गिरवीत जावी ll समय प्रसंग ओळखावा l राग निपटून सांडावा l आला तरी कळो न द्यावा l जामाताशी ll गर्दभापुढे टांगावी गाजरे l मग तो चालो लागे साजरे l काम करून घ्यावे l गोजरे संयमाने ll वानराशी म्हणावे तुझीच लाल l आपली कळो न द्यावी चाल l मग खुशाल लादावी पखाल। हल्याच्या पाठी ll दिसामाजी शालजोडीतील हाणावी l मासामाजी ‘दे धरणी ठाय’ ताणावी l नयनी गोनेत्रातील करुणा आणावी l हेत साधताना ll जे पेटल्यावीन जाळीतसे l जे जळावीण क्षाळीतसे l जे रज्जुविनाही माळीतसे l तैसे होओनी राहावे ll जो जामात होवुनी श्वसुरासी छळी l श्वसुर होताच दशमग्रह निर्दाळी l मग पावे कीर्ती जळीस्थळी ll तो एक चतुर पुरुष जाण ll जामाताशी दया न ये कामा l क्रोध नये सोयर्याच्या धामा l जेथ ज्याचा महिमा l ते तेथेच योजावे ll खळा जमातांचे ठाई l शांती धरता पडणे अपाई l जैसे कंटक मर्दावे पायी l तेवी जामात दंडावे ll साधता वरीलिया युक्ती l कन्या संसारी सुखी होती l जामाताची कुंठते मती l श्वासुरापुढती ll देखुनी कन्येच्या दु:खा l स्नुषेचा होवुनी राहावे सखा l तेथ दाविता क्रूरता l अध:पाता जाईजे ll मग हरेल जामाताचे दु:ख l अवघे गोत पावती सुख l अनित्य संसारी कौतुक l ऐसे करुनी जावे ll या उपरीही न आकळता द्वाड l जमातासमोर न लागे पाड l मनाचे ठोठवावे कवाड l तेथ मार्तंड असेची गा ll

वाचने 1207 वाचनखूण प्रतिक्रिया 2