केयलफिड्डी!
(नंब्र सूचना: कृपया कवितेचे रसग्रहण आपापल्या मनातच करावे. कवीकडे स्पष्टीकरण मागू नये. कवी मिपावरून हद्दपार होऊ इच्छित नाही. तसेही समझनेवाले अगोदरच कवितेचा अर्थ समझ गये है!)
बाई अगदी बावनकशी
शिनेमावाणी दिसते जशी
काका नेतो तिला डेटवर
पिळत पिळत आपुली मिशी
कॉफी, गजला, पुस्तकचर्चा
काका जाणी जुने बहाणे
"वाड्यावरती येइल का ही?"
मनात मांडे गुपचुप खाणे
बाई परंतू त्यास सवाई
ऐकुन हसते चावट कविता
फिरुनी सांगे, "सहा वाजले,
कन्या थकली वाट पहाता"
पर्स उचलुनी भुर्रकन जाते
टाळुन त्याची लाडीगोडी
हिरमुसलेले काका बसती
कुरवाळत मग 'केयलफिड्डी'
(पूर्णविराम)
वाचने
3402
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
'केयलफिड्डी' .... छान !
In reply to 'केयलफिड्डी' .... छान ! by चौथा कोनाडा
कवीची विनंतीच होती तशी!
आरारारा =))
In reply to आरारारा =)) by टवाळ कार्टा
:-)