पावसा!
कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा
एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा
वाटतो विश्वास सार्या निश्चयाचा मेरू मी
अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा
नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी
पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा
हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती
शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा
हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी
बाळगोपाळांस सार्या जमवून जा रे पावसा
वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे
सार्यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा
चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी
भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा
-ऋषिकेश
Taxonomy upgrade extras
मिसळपाव