दूरदेशी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
- Read more about दूरदेशी...
- 13 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
गेलो जरी तुला मी सोडून दूरदेशी
येइन धावुनी मी जेव्हा तु साद देशी
डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा
माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा
असशील तु उदास, वा खिन्न तू मनात
मी ही तिथे असेन तुझियाच आठवात
स्मरशील तू मला अन येइल मन भरोनी
तेव्हा तुलाच सखये पाहीन मी ही स्वप्नी
असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी
घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी