घरात भरल्या घुसले उंदीर...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
घरात भरल्या घुसले उंदीर
गणयंत्राच्या समोर बसले
ज्ञानपिपासू अधीर डोळे
चकाकत्या पडद्याला डसले
ज्ञानाची ती अपार विश्चे;
हवे हवे ते क्षणात वेचून
क्लिकक्लिकणारा उंदीर आणी-
थेट घरातच अवघे खेचून
गणक ऋषींच्या नव्या पिढीचे
उंदीर हेची बाप जहाले
माणूसघाणे, बधीर रोबो
घराघरांतून जन्मा आले.
-अविनाश ओगले
वाचने
4411
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
क्या बात है !
माणूसघाणे, बधीर रोबो
घराघरांतून जन्मा आले.
ह्यात "रोबो" हा शब्द इतका चपखल बसलाय! वा !
- सर्किट
In reply to मस्त, रोबो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
(सहमत)बेसनलाडू
In reply to मस्त, रोबो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आपली वाचक
अदिती
- लगे रहो !! :-)
In reply to अविनाश मर्ढेकर ! :-) by मुक्तसुनीत
अविनाश मर्ढेकर ! :-)
हेच म्हणत होतो मी पण. उत्तम कविता झालि आहे अविनाशशेठ.
पुण्याचे पेशवे
In reply to अविनाश मर्ढेकर ! :-) by मुक्तसुनीत
पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्याविण..... मर्ढेकरांची आठवण झाली.
ओगले साहेब, अजून येऊ द्या !!! अशाच नवकविता.
अविनाशशेठ, 'रोबो' पांगळा करुन गेला! उच्च!!
चतुरंग
सुरुवातीला ज्ञानपिपासू, शेवटी बधीर...
("डसण्या" सुरुवातीलाच उंदरांच्या सुळसुळाटातला अपशकून दाखवला होता.)
मार्मिक कलाटणी! शब्दांची निवड नेमकी आणि प्रभावी वाटली.
गणक ऋषींच्या नव्या पिढीचे
उंदीर हेची बाप जहाले
माणूसघाणे, बधीर रोबो
घराघरांतून जन्मा आले.
पटले!
गणक ऋषींच्या नव्या पिढीचे
उंदीर हेची बाप जहाले
माणूसघाणे, बधीर रोबो
घराघरांतून जन्मा आले.
वा! क्या बात है.... :)
माणूसघाणे, बधीर रोबो
घराघरांतून जन्मा आले.
वा! खरंच खूप सुंदर आहे कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कविता आणि भाष्य. अतिशय आवडली.
वा पंत,
क्या बात है! सही.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती| मुक्ता आत्मस्थिती सांडवीन||
अतिशय सुंदर
कविता मनापासुन आवडली
सुंदर नवकविता
:-)
मस्त, रोबो