मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दूरदेशी...

पद्मश्री चित्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
गेलो जरी तुला मी सोडून दूरदेशी येइन धावुनी मी जेव्हा तु साद देशी डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा असशील तु उदास, वा खिन्न तू मनात मी ही तिथे असेन तुझियाच आठवात स्मरशील तू मला अन येइल मन भरोनी तेव्हा तुलाच सखये पाहीन मी ही स्वप्नी असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी

वाचने 4007 वाचनखूण प्रतिक्रिया 13

मनीषा 30/07/2008 - 16:58
कविता खुप छान आहे... आवडली असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी ... हे खुप आवडले

मिसळपाव 30/07/2008 - 17:04
फुलवा, भावपूर्ण कविता आहे. 'तू लांब दूर तेथे, हूरहूर मात्र येथे' या जुन्यातल्या भावगीताची आठवण झाली.

प्राजु 30/07/2008 - 18:59
काय सुंदर लिहिली आहे कविता...सगळ्याच ओळी सुंदर. डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा या जास्ती आवडल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

>> डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा >> माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा खूपच सुरेख लिहिलं आहेस :)

पारिजातक 01/08/2008 - 13:02
एक नम्बर कविता... भरून आल हो एकदम (हे उपरोधाने बोलने नव्हे. ) !!!! :''( पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!