तुझे नि माझे मिटू दे अंतर
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
दहनाभुमिवर फुले वहाया
येशील ना तू माझ्या नंतर
मधले सारे विरून जाऊ दे
मिटून जाऊ दे आपुले अंतर
अवचित अश्रु येतील डोळा
थेम्ब मातीचा होइल ओला
तृप्त तृप्त मी होउन जाइन
मातीतून मी कविता गाइन
अश्रु तुझे ते प्रेम बोलतील
पुन्हा स्मृतींचे मेघ दाटतील
वेळ निघुनी असेल गेला
पाचोळ्यावर पाउस ओला
उगीच आपुल्या हट्टापायी
हरवून बसलो जे काही क्षण
पुन्हा परतुनी नाही यायचे
किती बोलावा करा निमंत्रण
हिशोब कसला झाले गेले
आठवणींचे काहूर उरले
रंग उडुनी गेला आता
दोनच अश्रु जाता जाता
असेच ना हे नेहमी होते
वेळ जातो अन ओढ लागते
तुटण्या आधी रेशीम धागे
एकच पाउल येऊ मागे
वाचने
2600
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
खूप सुंदर..
काय सुंदर कविता आहे
सुंदर
सुंदर कविता..
+१
सुंदर कवित