मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

श्वास

पेशवे बाजीराव तिसरे ·
लेखनविषय:
तुझ्याच आठवांमधुनी सखे काही श्वास तरंगून गेले घडा रिताच राहीला आयुष्याचा अन प्राण कलंडून गेले हात तुझे ते हातांमधले एकांती स्मरुनीया गेले रंग हळवे ते शपथांचे भासात विरुनीया गेले आधार वाटणारे तुझे ते डोळे काल स्वप्नात दिसुनीया गेले दडपलेले दुःख मनातील शब्दात उतरुनिया गेले

प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

केसुरंगा ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आपल्या चमत्काराने चक्क जुलै-आगष्टात देखील एप्रिल फळे क्रमशः चाखायला देणारे आणि आपल्या स्वप्नांच्या चमत्कारी(क) दुनियेतून क्रमशः फिरवून आणणारे आमचे परमजालस्नेही विजूभाऊ यांनी आज एका विडंबनाला प्रतिसाद देताना टीका करण्याच्या जोषात 'वेडात मराठे वीर दौडले सात' चे विडंबन करुन दाखवा पाहू आणि स्वतःला धन्य समजा, असे उद्गार काढले मात्र! डोक्यातुनी उठली एक वीज जोरात प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! हे लिहिले कुचकट थोडे किंचित वेले सरदार आम्ही सरसावुन उठलो शेले आव्हान देऊनी आज, तुम्ही हो फसले करणार विडंबन पाहा आता, फटक्

रुद्ध प्रतिभा चतुरस्र वाहू दे

धनंजय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता - का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता! निवृत्तीत सुमार - काव्यप्रतिभा याची रुळा सोडते! जैशी का अनिरुद्ध होत स्रवते, वाटा नव्या शोधते. ("विडंबकाची कात चढवल्यानंतरही उत्तम कवींच्या प्रतिभेच्या प्रसवास मुळीच निरोध होत नाही," असे काही लोकांचे मत आहे. मिसळपावावरील दोन सिद्धहस्त कवींची उदाहरणे लक्षात घेता हे मत मला पटत नाही.)

एका तळ्यात होती बदके पिले अनेक...

मृगनयनी ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एका तळयात होती बदके पिले अनेक.... मी एक रानफूल.. नि तो राजहंस एक... संगणक शिकण्यासाठी जॉईन केलं 'अपटेक'... होती सुट्टी क्लासला.. म्हणून गुंफिला गजरा सुरेख... सुटे पैसे नव्हते, म्हणून भाजीवाल्याला दिला चेक... पण त्या अडाण्याला, तो वटवण्याची कळली नाही मेख... कशी कळणार त्याला, तो भाजीवालाच होता फेक... जेवायचा नव्हता मूड, म्हणून घेतलं नुसतं मिल्कशेक... सर्विसिंगला गाडी टाकली, कारण फेल होते ब्रेक... आईने दिले देवाचे निर्माल्य, म्हणाली पाण्यात टाक... सापडले एक तळे मजला, म्हणजे विंग्रजी तला लेक... त्याच, एका तळ्यात होती बदके पिले अनेक.... ( 'प्राची' ला 'गच्ची 'जोडण्याचा...एक अंमळ अट्टाहास...) :)

नव्हतो ग! मी सजणे असा

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी - मजरू) नव्हतो ग! मी सजणे असा केला बदनाम इतरानी जसा दोष तुही दिलास थोडासा गमविला मी जगाचा भरवंसा नव्हतो ग! मी सजणे असा असेल खरे जे दिसले नयनाला सजणे! धोका मिळाला नजरेला किती किती म्हणूनी वाद घातला होता ग! हा इतरांचा दुष्ट फैसला केला बदनाम इतरानी जसा नव्हतो ग! मी सजणे तसा ठोकरूनी तू माझ्या मनाला तोडूनी सजणे! गेलीस प्रीतिला इतर सगळे नाचले ह्या दिवाळीला नव्हतो ग! मी सजणे असा केला बदनाम इतरानी जसा सजणे! नको विचारू ह्या दुखापतीला दोष जखमेचा तुझ्याच आहे हाताला नको विचारू कसले दुःख मनाला दिला ग! इतरानी छ्ळवाद अपुल्याला केला बदनाम इतरानी जसा नव्हतो ग! मी सजणे तसा श्रीकृष्ण सामंत

(जिज्ञासू)

चतुरंग ·
लेखनविषय:
आदरणीय ज्येष्ठ विडंबनकार 'खोडसाळ' यांच्या स्वतंत्र कल्पनेवर आधारित रचना 'जिज्ञासू' वाचून आम्हाला विडंबनधर्माला जागणे भाग पडले! ;) 'प्रयत्ने कवितेचे शब्द बदलता' गळलेले 'विडंबन' खाली देत आहोत. त्याला जालगतींकडून यथावकाश सद्गती मिळेलच!

भेळपुरीच्या गाड्या

केशवसुमार ·
लेखनविषय:
घाटावरच्या भटांनी काल केलेली विडंबनाची भेळपुरी खाल्याने आमच्या पोटात गडबड सुरू झाली.. (डिस्क्लेमरसाठी कृपया पहिले कडवे पहा) व्यथा ऐकली भटा तुझी मी अता ऐक तू माझी कथा कविता माझी तू हलकी घे, आहे जरा ती यथातथा नवखा असशी सदस्य तू रे वय तव आहे हप्त्याचे इतक्यातच अन तुला जाहले अजीर्ण विडंबन कवितांचे? हसता हसता पोट दुखे मी वाचून हे झालो बेजार चहुबाजूंनी झाला मजवर द्या उत्तर ऐसा भडिमार महान तुम्ही कवी घाटीचे अन तुमची कविता भारी प्रदार्पणातच तुम्ही खिलवली 'विडंबनाची भेळपुरी' या भेळेचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे सर्किट, मुक्ती या दोघां

म्हणून म्हणतो ऐका माझे ...

अंकुश चव्हाण ·
लेखनविषय:
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. प्रेमाचे दिवस संपले की वाहतात संशयाचे वारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... त्याला भेटायाची वेळ ती मुद्दाम विसरते. त्याला काही केल्या तिचा जन्मदिन न स्मरे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... लग्न झाले की ओढ सरते, सुकतात सारे प्रेमाचे झरे. महिन्याचा खर्च भागवताना डोळ्यांसमोर दिसतात तारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... ओफिसमध्ये साहेबाची कटकट, घरात बायको आणि पोरे.

डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..!

उपटसुंभ ·
लेखनविषय:
बरं झालं असतं "ओएसओ" जर बघितला नसता. डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता.. डोळ्यांमधल्या अजब अदा राहून राहून छळणार. दिलाचे पतंग आणि किती श्वासावरती जळणार. जग सुनं सुनं होणार पिक्चर सरता सरता. डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता.. युवराजसोबत फ़िरते ती अन ढोणीसोबत दिसते. क्रिकेटमधले तिला सांगा नक्की किती कळते ! क्रिकेट,बॉलीवुड तेवढंच खरं बाकी गोंधळ नुसता. डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता.. या जन्मी जर नाही जमलं पुढच्या जन्मी बघू. आपण सुद्धा तेव्हा ओम कपूरसारखं जगू. "दि एन्ड" नाही, पिक्चर अजून बाकी आहे दोस्ता, डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..! -- अभिजीत दाते