Skip to main content

म्हणून म्हणतो ऐका माझे ...

लेखक अंकुश चव्हाण यांनी गुरुवार, 07/08/2008 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. प्रेमाचे दिवस संपले की वाहतात संशयाचे वारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... त्याला भेटायाची वेळ ती मुद्दाम विसरते. त्याला काही केल्या तिचा जन्मदिन न स्मरे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... लग्न झाले की ओढ सरते, सुकतात सारे प्रेमाचे झरे. महिन्याचा खर्च भागवताना डोळ्यांसमोर दिसतात तारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... ओफिसमध्ये साहेबाची कटकट, घरात बायको आणि पोरे. पाहुणे येऊन त्रास देती तशात ही महागाई मारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... एकटेपणा जरी वाटला बरा, संध्या छाया भिववती मना. ते सूरकुतलेले मावळतीचे दिवस सांगा घालवावे कोणाच्या आधारे? तरीही म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे...
लेखनविषय:

वाचने 1444
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

लग्न झाले की ओढ सरते, सुकतात सारे प्रेमाचे झरे. महिन्याचा खर्च भागवताना डोळ्यांसमोर दिसतात तारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे... शब्बास मित्रा