प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!
Taxonomy upgrade extras
आपल्या चमत्काराने चक्क जुलै-आगष्टात देखील एप्रिल फळे क्रमशः चाखायला देणारे आणि आपल्या स्वप्नांच्या चमत्कारी(क) दुनियेतून क्रमशः फिरवून आणणारे आमचे परमजालस्नेही विजूभाऊ यांनी आज एका विडंबनाला प्रतिसाद देताना टीका करण्याच्या जोषात 'वेडात मराठे वीर दौडले सात' चे विडंबन करुन दाखवा पाहू आणि स्वतःला धन्य समजा, असे उद्गार काढले मात्र!
डोक्यातुनी उठली एक वीज जोरात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!
हे लिहिले कुचकट थोडे किंचित वेले
सरदार आम्ही सरसावुन उठलो शेले
आव्हान देऊनी आज, तुम्ही हो फसले
करणार विडंबन पाहा आता, फटक्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!
विषण्णसुन्न वाचून विडंबन सेना
अपमान बुजविण्या तेग काढूनी म्याना
मिपावर फिरले शोध, शोध त्या कवना
सापडले गाणे जालावर निमिषात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!
खालून राग, वर राग, राग बाजूंनी,
प्रतिसाद खरडले सहस्त्र नि बेईमानी
गर्दीत तळपले सर्व विडंबक मानी
बघ तुम्हा जाळतील आज असे वणव्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!
कवितांवर दिसतिल अजुनी आमुच्या टाचा
'मिसळीत' तरंगे अजुनी रंग शब्दाचा
खरडींतून उठतो अजुनी सूर भीतीचा
अद्याप शहाणी कुणि जालावर येत
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!
स्वप्नात तुम्ही तो प्रवास इतुका केला
क्रमशः फळांनी वाचक पुरता छळला
मग काय करावे इरशाद आमुचा झाला
अन् 'बैल' मिळाला आज आम्हा सस्त्यात
प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!
केसुरंगा
वाचन
8083
प्रतिक्रिया
30