Skip to main content

कविता

पाऊस

लेखक अनिरुध्द यांनी शनिवार, 04/10/2008 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रिष्माची ती अतिदाहकता जाळून टाकी प्राणीमात्रा पावसाची एक सर बरसता क्षणात येई आल्हादकता पा़ऊस आला पाऊस आला सर्वांना भिजवून गेला झाडे, वेली, पाने, फुले, गाऊ लागती आनंदी गाणे पाऊस ओला, पाऊस हिरवा स्रुष्टी गाते एक मारवा पाऊस थंडी, पाऊस धुकं स्रुष्टीला त्याचं किती कवतीकं हिरवी शेतं, हिरवी रानं डोळ्याचं फेडती पारणं डोंगरावरती हिरवी दुलई आकाशाला इंद्रधनू झिलई हिरवे डोंगर, वाहती निर्झर तारुण्याला येई पुन्हा भर नदी, नालेही भरून वाहती सागरा मिळण्या अधीर असती आला श्रावण, गेला श्रावण भादव्यातले संपले सारे सण वेद लागले जाण्याचे वेळी अवेळी बरसण्याचे पावसातले नक्षत्र हस्त पाऊस येई गाठून सूर्यास्त

श्राद्ध

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 03/10/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने पुनर्प्रकाशित. श्राद्ध
मी माझ्या आईचे श्राद्ध दरवर्षी घालतो, ती जीवंत असताना ,तीला कधी, प्रेमाने साडी आणली नाही... पण तिच्या पिंडावर रेशमी धागा मात्र, दरवर्षि घालतो....... ती जीवंत असताना, तिला कधी, प्रेमान जेवु घातले नाही, पण तिच्या पिंडाला पक्वानांचा नेवैद्य मात्र दरवर्षि दाखवतो.... ती आजारी होती..

..बाकी खरंच काही नाही

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 03/10/2008 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण मला आता ,मुळी सुद्धा येत नाही उगीच डोळे भरुन येतात, बाकी खरंच काही नाही.. फूल बघुन मला आता कुणी सुद्धा आठवत नाही हळुच नजर वळवते मी, बाकी खरंच काही नाही.... चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही... पहाट जेव्हा सरत असते ,तुझं स्वप्न पडत नाही झोप मात्र निघुन जाते ,बाकी खरंच काही नाही... एकटं एकटं वाटतं पण ,तू मुळीच आठवत नाहिस विसरलेच नाही तुला मी ,बाकी खरंच काही नाही...
Taxonomy upgrade extras

काळ थांबला कधीचा...

लेखक राघव यांनी गुरुवार, 02/10/2008 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी.

* महामानव गांधी*

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 02/10/2008 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
* महामानव गांधी* स्वतसाठी नसलेल स्वप्न महात्म्याने पाहिल, सामान्यांच्या स्वप्नात नसलेल स्वातत्र्य महात्म्याने आणल ! बाबा तुझ्या या देशात लोकशाहीची पाळ्मुळं घट्ट आहेत अजुन, मात्र, मेळघाटातल्या आदिवासींना स्वातंत्र्य कशाशी खातात हे , माहित नाही अजुन ! तुझ्यावर इतके प्रेम या लोकांचे तुझ्या जन्मदिवशी ठेवलाय यांनी ड्राय डे, बहुतेकांचा असतो याच दिवशी पहिला-वहिला 'ट्राय डे' बाबा सान्गु नकोस कुणाला तुला म्हणुन सांगतो , पण इतर दिवसांच्या पेक्षा ड्राय डे च्या दिवशी बाट्ल्यांचा खच जास्त असतो ! घेतील काही लोक जेव्हा असत्य व हिंसेचा वसा, तेव्हा दोनच तत्वे स
Taxonomy upgrade extras

म्रुगजल

लेखक सचिन जाधव यांनी गुरुवार, 02/10/2008 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
म्रुगजल मण हे माझे, जसे पाणी हे वाळ्वटातले, सान्भाळु तरी किती हे याला, हे भरकटतच चालले. नाही कोणी विचार करणारे, नाही कोणी वाट पाहणारे, तरी पण आशा आहे याला, कधीतरी येइल-कोणी साथ देनारे, माहित असुनही सर्व काही, वेडी आशा नाही लपलेली, कधीतरि एकदिवस येइल आठ्वण, म्हणून अजुनहि वाट पाहणारे. कधीतरि एकदिवस येइल ती, अण आठवेल तिला सर्वकाही, त्यावेळेस कदाचीत नसतीलही हे क्षण, ज्यासाठी तळमळत होते......"म्रुगजल माझे हे मण."

गांधी जयंति निमित्ताने (आम्हि कपाळ करंटे महात्माजींची क्षमा मागतो)

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 02/10/2008 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी हि भोंदू तुहि भोंदू आपण दोघे भोंदू जे जे नाहित भोंदू ते आहेत सारे गांडू बोले त्यैसा चाले तयाचि कापून टाकु पावूले सत्याचे जे उदघोष करिती तयांचे दाबून टाकु गळे गांधी जरीका पुन्हा जन्मला आम्हि मारून टाकु त्याला कार्य तुझेरे संपले केव्हाच पुन्हा कशाला आला..........? परतन्त्र होईल देश जेव्हा हा बोलवु तुला रे पुन्हा सत्य अहिंसा आहे येथे सध्या तरी रे गुन्हा.....!
Taxonomy upgrade extras

बुद्धिबळाच्या युद्धपटावर!

लेखक सचिन जाधव यांनी बुधवार, 01/10/2008 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धिबळाच्या युद्धपटावर, एक प्याद निमुटपने लढत होत..... स्वबळावर स्वहिमतीवर, एक एक घर ते पुढ सरकत होत. समोर येना-या प्रत्येक सन्कटाला, ते धैर्याने समोर जात होत, स्वबळावर स्वहिमतीवर, एक एक घर ते पुढ सरकत होत. लढता लढता ...लढता लढता, पोहचल शेवटच्या घरट्यात, तेव्हा ते प्याद एक वझिर होत, स्वबळावर त्यान आता राजालाही, नमवल होत. पण्.........पण ???? खेळ सन्पला तेव्हा...... ते प्याद मात्र एक प्यादच होत, अण पुन्हा एकदा , लढण्यासाठी सज्ज होत.........पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज होत.