मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आत्मसमर्पण

चन्द्रशेखर गोखले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
परदेशी नोकरीची संधी चालून आलेला मुलगा आई वडिल इथ एकटे पडतिल म्हणुन संधी नाकारायला निघतो,तेव्हा वडिल त्याला सागत आहेत..........
माझ्या बेड्या तुझ्या पायी उगाच अडकवु देणारनाही घे भरारी उंच अंबरी तुझेच आकाश अन दिशा दाही म्हातारपणि आम्हाला विचारले पाहिजेच असे नाही जन्म देताना तुला आम्ही सुद्धा विचारले नाही माणुसकीला धरुन नाही असेही तु मानु नकोस नव्या युगाची गरज आहे वाइट वाटुन घेउ नकोस अरे काळा बरोबर आम्ही सुद्धा जरा बदलल पाहिजेच कि पाळणा घरी ठेवुन तुला आम्हीहि नोकरी केलिच कि तु तीथे, आम्ही इथे चिंता मुळीच करायची नाही अरे आम्ही सदा तुझ्या ह्र्दयी तसे फारसे लांब नाही ए बाबा! ए...पोरा.. उठ असा रडु नकोस यश तुल खुणावते आहे अशी संधी सोडु नकोस.. अरे.. लाकडे गेली आमची स्मशानी आता राहिले हे सरपण..! जा लेका.. जा.. पटकन का करू आत्म समरपण...! ! !

वाचने 2731 वाचनखूण प्रतिक्रिया 10

राघव 04/10/2008 - 22:54
कविता छान आहे. आणि कल्पना माडण्याची तुमची हातोटी सुद्धा. हात कसलेला आहे यात शंकाच नाही. पण, अरे.. लाकडे गेली आमची स्मशानी आता राहिले हे सरपण..! जा रांडेच्या.. जा.. पटकन का करू आत्म समरपण...! ! ! या ओळी का कुणास ठाऊक आवडल्या नाहीत. असो, स्पष्टोक्तीबद्दल राग नसावा. शुभेच्छा. :) (स्पष्ट)मुमुक्षु

प्राजु 04/10/2008 - 23:07
कल्पना अतिशय सुरेख आहे. आपण मांडलीही अगदी सुंदर. पण अरे काळा आम्ही सुद्धा जरा बदलल पाहिजेच कि पाळणा घरी ठेवुन तुला आम्हीहि नोकरी केलिच कि या ओळी ...सत्य आहे. मुमुक्षु म्हणतात त्याप्रमाणे शेवट खटकला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कविता आणि आशय आवडला, पण जा रांडेच्या.. जा.. पटकन का करू आत्म समरपण...! ! ! वडिलांनी स्वतःच्याच मुलाला रांडेच्या म्हणणं माझ्या डोक्याला नाही झेपलं! अदिती

In reply to by चन्द्रशेखर गोखले

विसोबा खेचर 06/10/2008 - 09:32
कोकणी माणुस हा बोलि भाषेत शिव्यांचा वापर करतो, त्यात प्रेम असते सहमत आहे! :) आपला, तात्या देवगडकर.

मदनबाण 05/10/2008 - 04:31
सुंदर कविता,,,फार आवडली.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

विकास 05/10/2008 - 10:07
... एकदम आवडली. परदेशी जाण्यासंदर्भात दोन टोके असतात. (एक तर "क्रेझ" अथवा दुसरा "हळवेपणा") ह्या कवितेने त्यातील सुवर्णमध्य दाखवला आहे.