आई
लेखनविषय:
आई
जगात सगळीकडे जिचा निवास
देवापुढे जिला आद्य स्थान
प्रसिद्ध आहे जी जगाची राणी
ती म्हणजे तुमची -माझी आई
कधी डोळयातील अश्र होऊन भिजुन जाईल.
कधी तलवारीची धार बनून चमकून जाईल.
कधी ढगातून वीज होऊन गरजेल.
तर कधी चंदन होऊन झिजेल.
पण आपल्या पिल्ल्याच्या सुखासाठी झटेल
अशी तुमची-माझी आई..........
तिची माया व्यापणार नाही सागरातील पाणी .
तिची सर नाही अंधारातुन प्रकाशाकडे नेण्यार्या ज्योतीला
तिच्या हदयाची उपमा नाही झाडावर उमललेल्या फुलाला
ती जवळी नसते तेव्हा मोल वाटत तिच्या नसण्याचं
सागरतील अमर्याद लाटांची गणना होईल
पण आईचे ऋण ना फेडता येईल.
अशी धन्य धन्य ती तुमची -माझी आई............................
वाचन
4528
प्रतिक्रिया
0