Skip to main content

फाऊंटन पेन!

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 08/10/2008 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
हाता मधलं फाऊंटन पेन! झरझरणारे थेंब थेंब.. काळी-नीळी लाल-जांभळी हिरवी-पिवळी सळसळती रेघ!! हाता मधलं फाऊंटन पेन! झुळझूळणारे थेंब थेंब.. खळखळणारी खरखरणारी खदखदणारी भळभळती रेघ!! हाता मधलं फाऊंटन पेन! झिळमीळणारे थेंब थेंब.. वळती थांबती वहाती चिरतीमुरती रेघ हाता मधलं फाऊंटन पेन! झगमगणारे थेंब थेंब.. झरझर ताना झुळझूळ ताना झिळमीळ ताना झिरपती रेघ ======================= स्वाती फडणीस.................. ०८-१०-२००८
लेखनविषय:

वाचने 2288
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

पेन ही एकच वस्तू... पण ते ज्याच्या हातात जातं त्याच्या स्वभावानुसार ते पेन लेखन करतं... खुप मस्त लिहिलं आहे... (कधी सळसळती तर कधी भळभळती रेघ ओढणारा) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

कविता आवडली... साध्या फाऊंटन पेनवर खूप छान लिहिलं आहे, स्वाती. (अवांतर -- संदीप खरेची 'अल्कोहोल' कविता आठवली. तुमच्या कवितेचा ओघ असाच वाटला. हे मी सन्मानार्थी म्हणतोय :) )

:) पण मी ही कविता अप्रकाशित ठेवलेली मला किल्लीचे चिन्ह ही दिसत आहे ... मग?