मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काव्य

शर्मीला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मी प्रेम केलय तुझ्यावर फक्त तुझ्यावर फक्त तुझ्यावर या वेड्या आशेने की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर संपुर्ण तन-मन-धन लावून तुला लिहिल मनातल्या विचाराना व्यासपीठ दिधल फक्त एका वेड्या आशेने की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर लिहिन ही तुला वाचीन ही तुला आठवणीत साठवीन ही तुला तु फक्त एकदा हसून दाखव मला मी प्रेम केलय तुझ्यावर फक्त तुझ्यावर फक्त तुझ्यावर या वेड्या आशेने की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर सुरुवात ही तूच जीवन ही तूच शेवट ही तूच अशीच खूप-खूप सूचत रहा मनाला माझ्या आनंद देत रहा तेव्हाच मी समझेन की तुही प्रेम केलस माझ्यावर

वाचने 2801 वाचनखूण प्रतिक्रिया 11

आनंदयात्री 10/10/2008 - 20:14
छान लिहलय :)

शितल 10/10/2008 - 20:29
काव्य छान लिहिले आहे. :)

रुपा 11/10/2008 - 09:57
तुझ्या प्रेमरुपी काव्याला माझ्या सुवर्ण शुभेच्छा!

Bhakti Parab 11/10/2008 - 10:10
फारच छान! तुला खूप-खूप काव्य सुचु दे! तुझ्या काव्यासाठी माझ्या खूप-खूप शुभेच्छा!

मदनबाण 11/10/2008 - 10:16
छान.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

श्रेया देसाई 11/10/2008 - 10:49
तुला अश्या प्रकारच्या छान छान कविता सुचुदेत. हि कविता खुप छान आहे.

विसोबा खेचर 12/10/2008 - 10:45
हम्म! कविता अंमळ जास्तच प्रेमळ वाटली.. :)

In reply to by विसोबा खेचर

ऋषिकेश 12/10/2008 - 12:40
कविता अंमळ जास्तच प्रेमळ वाटली..
+१ :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 12/10/2008 - 12:52
कविता अंमळ जास्तच प्रेमळ वाटली.. होतं सुरुवाती-सुरुवातीला असं :) मग विरहाच्या कविता येतील आणि नंतर आठवणीच्या !!! आपल्या काव्य प्रवासाला शुभेच्छा !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 12/10/2008 - 14:34
मग विरहाच्या कविता येतील आणि नंतर आठवणीच्या !!! आयला! आमचे प्राडॉसाहेब अनुभवी दिसताहेत.. :)