Skip to main content

कृतार्थ जोडी

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 10/10/2008 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
कृतार्थ जोडी ==================== त्या तिकडच्या ग्रहमालेत एक सूर्य विझायला आलाय जळून जळून फुललेला निखारा अंमळ जरा पसरलाय. आतापर्यंत जळतच राहिलो आतापर्यंत जाळतच राहिलो मनातल्या मनात उजळणी करतोय गरगर फिरणारी पृथ्वी कौतुकाने पहातोय. त्याच्याच वयाची म्हातारी ती चाल तिची ही मंदावलीये खूप फिरले म्हणत तीही जरा टेकलीये तुझ्या भोवती फिरणारी मी ही भिंगरीच होते एक फेरा घेता घेता शेकडो वेळा गरगरले म्हणत कबुली देतीये. पिल्ल पाखरं उडून गेली त्यांनी त्यांची दिशा धरली कृतार्थ जोडी बोलतीये उरले सुरेल क्षण संगतीने जगतीये त्या तिकडच्या सूर्यमालेतली रात्र केव्हाच मागे पडलीये. ===================== स्वाती फडणीस ............. १०-१०-२००८
लेखनविषय:

वाचने 1619
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छानच आहे . अर्थ कळायला जरा वेळ लागला.पण मग दोन जोड्यांच साम्य लक्षात आल. आवडली कविता. मीनल.