हिच जगाची रीत असावी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
हिच जगाची रीत असावी
चंदनापेक्षाही झिजावे
माझे-माझे म्हणावे
अन त्या पिल्लांनी
त्याच्या मोबदल्यात काय दयावे
अनवाणी पायाने चालावे
उन्हात तापावे
पावसात भिजावे
अन पिल्लांना त्याची झळ ना लागू दयावी
पिल्लांना पंख फुटले की घरटे सोडून जावे
पाखरे बनून आपले काम सूरू करावे
परत फिरून घरट्याकडे न बघावे
त्या मात्या-पित्यांना कधी न विचारावे
हिच जगाची रीत
पुन्हा-पुन्हा तशीच रहावी
मग त्या पिल्लांच्या बनलेल्या पाखरांनी आपल्या पिल्लांच्या तशा
वागण्याने का रडावे?........
खर पिल्लुं ते जे असं न करतं
मात्या-पित्यांनी कष्ट करावे
पिल्लांना त्याची जाण असावी
हिच जगाची रीत असावी
पुन्हा-पुन्हा तशीच रहावी ...................
वाचने
1828
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
अपेक्षा
In reply to अपेक्षा by विजुभाऊ
वा....