Skip to main content

गंधविभोर

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 12/10/2008 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
शांत मनोहर अंगणामध्ये वेल पहुडली बाई अवखळ वारा अंगावरुनी लहरत, लहरत जाई सळसळला मग देह वेलीचा लटक्याने ती कापत राही हळुवार फुलांचा गंध चोरुनी वारा अलगद पसार होई गंधचोरट्या वारया तुजला कांय म्हणू मी आता .. ? स्पर्शाने सळसळल्या सार्.या अंगावरती लाटा नियंत्याला जाऊनी सांगीन समीरण झाला वेडा थांबव त्याचा वारु वेंधळा पायात अडकवूनी खोडा तुच मला ग केले, जाई अवखळ आणि गंधविभोर रागाने कां म्हणशी आता प्रांगणातला अल्लड चोर ? उमलत्या कळ्यांच्या वाटेवर मी चित्तचोरटा होऊनी येतो हवे हवे ते देऊनी त्यांना गंध फुलांचा घेऊनी जातो ( मग मी चोर कसा गं होतो ? ) नाते आपले निसर्गनिर्मित साजणी तुला माहीत सोडूनी वेडे हा राग मनीचा घे मजसी तू कवेत.
लेखनविषय:

वाचने 2176
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कविता आवडली . मीनल.

खास आहे कविता. हळूवार झाली आहे.. तुच मला ग केले, जाई अवखळ आणि गंधविभोर रागाने कां म्हणशी आता प्रांगणातला अल्लड चोर ? हे खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अतिशय गोड कविता बोरकरांच्या कवितेची आठवण झाली

लयबद्ध, सुंदर कविता. फार आवडली. (आस्वादक)बेसनलाडू

(|: कविता खुप छान आहे, आवडली. आपला आरंभशूर

वा! सुंदर कविता.... तात्या.

चित्त चोरटा - च्या जागी मूळ शब्द होता क्रुश्ण मुरारी , पण हा 'क्रु' योग्य नसल्याने आ़ख्खा शब्द गाळावा लागला. पण त्यामुळे ओळीचा अर्थ जरासा बदलला. नीट वाचल्यावर लक्षात येईल. तसेच "वार्या " हा शब्द योग्य प्रकारे लिहिताआला नाही. (आत्ताही नाही ) पण सवयीने हळूहळू नीटपणे लिहिता येईल. प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद!