कविता
वाटा वेगळ्या
गर्द निळाईने रंगले आभाळ
शांत तळ्याकाठी दिशा विसावल्या
हलकेच जरा छेडता वा-याने
पाण्यात तरंग होऊन सांडल्या
सोन्याची झळाळी माखलेली सांज
फुलवित आली प्राजक्तपाकळ्या
घुमे घंटानाद राउळाच्या दारी
दूर डोंगरात झांजाही वाजल्या
काजळे क्षितिज, अंधाराच्या संगे
गूढ, अनामिक सावल्या जागल्या
एका अवघड वळणावरून
झाल्या तुझ्या माझ्या वाटाही वेगळ्या
तुझ्या वाटेवर आतुर फुलांनी
मुलायम गंधपाकळ्या पेरल्या
माझ्या वाटेवर उदास काळोख,
काट्यांचे कुंपण, भयाच्या सावल्या
तुझी वाट साद सुखाची घालते,
उजळीत लाख चांदण्यांच्या कळ्या
माझी वाट घुटमळते एकटी,
जशा पायी मणामणाच्या साखळ्या
मी मराठी!
मराठी तू मर्द गडी
नसांतून मराठी वाहे
नको उपहास साहू
प्रश्न अस्तित्वाचा आहे!
कोणी म्हणे "घाटी साले"
हाण त्यांना खेटराने
महाराष्ट्री मराठीच
कापते का भितीने?
उगीचच इंग्रजाळे
गरज काय सवतीची
लाज वाटते का तुला
थोर माय मराठीची?
सेरेमनी थ्रेड,बर्थडे
सणदेखील इंग्लीश झाले!
दूध असता आईला
भुकटीला भरते आले!
अतिथी हे देव! पण
मान राखा संस्कृतीचा
एकजीव व्हा ना येथे
प्याला दूधसाखरेचा!
शिवछत्रपती कृपा
मराठी "मानाचे" झाले
मर्दा टिकव अस्मिता तू
देव "१०५" बोले!
महाराष्ट्र देश माझा
राज्य हे मराठी आहे
म्हण ताठ गर्जून तू..
होय "मी मराठी आहे...!!"
अनंगरंग
धुंद एकांत हा - तुझ्या सवेच रंगतो
प्रणयाचा पूर ही - र्हुदयी या उधाणतो ।
स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना
श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो ।
उष्ण अधर कापती - रंगती कपोलही
मुक्त कुंतलात या जीव तुझा गुंततो ।
झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे
रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो ।
विखूरले उशीवरी चांदणे अजूनही
नाहूनी प्रीतीत मन मोगराही उमलतो ।
बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली
रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो |
तक्रार
सखे मी शोधीतो तुझाच चंद्र कधीचा
पाणावले नयन दर्शना तरसले
का चांदणे सदा बरसले तुजवरी
बरसताना कसे मलाच विसरले
मोहरला देह ओलावली काया तुझी
वाटेवरुन माझ्या मेघही परतले
सावरले तुज पाहता मुग्ध दंवबिंदु
क्षितीजावरले माझ्या धृवही सरकले
थांबली पुनव, सखे तुज स्वागता
स्वप्नातले बघ माझ्या चंद्रही फिकुटले
विशाल
पौर्णिमा..
हृदयांत रंगलेल्या खेळात येशील का?
हा डाव प्रीतिचा गं तू पूर्ण करशील का?
बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे
मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का?
पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी,
होऊन धार मजला, तू चिंब करशील का?
दिवसांत कैकवेळा घेतो मिठीत तुजला
होऊन रातराणी श्वासात उरशील का?
भिजल्या अनेक रात्री बघ आठवांत तुझिया
ओलावल्या मनाने मज तू स्मरशील का?
दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे
ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का?
हे पाहिले तुझ्या मी, डोळ्यांत स्वप्न माझे
घेऊन ते उराशी साकार करशील का?
- प्राजु
Taxonomy upgrade extras
सागर किनारी...
सागर किनारी
दोघेच असावे
बोलता बोलता
मिठीत शिरावे
मिठीत शिरून
लटके रुसावे
प्रेमाच्या आर्जवी
खुदकन हसावे
खुदकन हसूनी
भुलावे झुलावे
रुपेरी वाळूत
पाउल नाचावे
नाचत हळूच
हात हे गुंफावे
स्पंदन प्रेमाचे
हृदयी ऐकावे
हृदयी ऐकावे
डोळ्यांत बघावे
निळुल्या पाण्यात
डुंबुनी यावे
डुंबता डुंबता
श्वास हे दुणावे
ओठांचे अमृत
ओठांत शिरावे
ओठांत शिरूनी
गुलाबी जगावे
स्वप्नांच्या गर्भाचे
बीज तू व्हावे!
Taxonomy upgrade extras
बस इतकंच सांगायचंय
बस इतकंच सांगायचंय
.
फ्रीजमधे होते
ते दही
मी खाऊन टाकले -
संपवले
.
बहुधा तू ते
होतेस जपले
विरजणासाठी
उद्याच्या
.
मला माफ कर, ते
मस्त होते
किती मलईदार अन्
किती गार
.
---
हे पुढील कवितेचे रूपांतर आहे :
---
This Is Just To Say
.
I have eaten
the plums
that were in
the icebox
.
and which
you were probably
savin
Taxonomy upgrade extras
कोणास ठाउक...!
कुणाचाही जयघोष करावा
इताका मी लहान नाही..
कुणाचाही उपमर्द कारावा
इतकाही मी महान नाही..!
मी असा एक पांथस्त आहे ,
जो शोधतो आहे मार्ग ,
अंतःस्थ होण्याचा..
कधी पासुन.. ? कोणास ठाउक..!
कारण...
मला कधीच नाही सापडलं
या गर्दीत माझ अस्तित्व..
अन तरी ही मी सामिल होतो
त्या गर्दीत अधुन मधुन.. का .. ? कोणास ठाउक..!
मी सापडलो आहे द्वंद्वात
जीवन मरणाच्या.. कारण
मला वाटते आदर्शां बद्दल
आदरयुक्त भीती..
पण कळत नाही कशी रोखु
माझी नैतिक अवनती..
हीणकस स्वार्थपरता..
हि लालसा खदखदती...
मला वाटतं हा लढा
मी हारणार....
मी लढता लढता
असाच मरणार.. कधी..? कोणास ठाउक..!!!
Taxonomy upgrade extras
मृत्योर्मां अमृतं गमय !
सुर्य उगवताना खुप सुंदर दिसतो , पण
त्याही पेक्षा सुंदर दिसतो मावळताना ,
कारण तो देतो दशदिशांना...
उद्याच्या सुर्योदयाची ग्वाही...!
सरणावर मरण जळतांना ,
कुणीतरी नाजुक ढुश्या देत असतं
मातेच्या गर्भालाही...!!
मृत्योर्मा अंमृतं गमय ..
याचा अर्थ हाच असावा
बहुधा...!!!!
Taxonomy upgrade extras
मिसळपाव