मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सागर किनारी...

उमेश कोठीकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सागर किनारी दोघेच असावे बोलता बोलता मिठीत शिरावे मिठीत शिरून लटके रुसावे प्रेमाच्या आर्जवी खुदकन हसावे खुदकन हसूनी भुलावे झुलावे रुपेरी वाळूत पाउल नाचावे नाचत हळूच हात हे गुंफावे स्पंदन प्रेमाचे हृदयी ऐकावे हृदयी ऐकावे डोळ्यांत बघावे निळुल्या पाण्यात डुंबुनी यावे डुंबता डुंबता श्वास हे दुणावे ओठांचे अमृत ओठांत शिरावे ओठांत शिरूनी गुलाबी जगावे स्वप्नांच्या गर्भाचे बीज तू व्हावे!

वाचने 2410 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्राजु 13/04/2009 - 06:06
हलकी आणि.. सुंदर. खुदकन हसूनी भुलावे झुलावे रुपेरी वाळूत मन नाचवावे या ओळीत.. नाचवावे ऐवजी रूपेरी वाळूत पाऊल रूतावे... हे कसे वाटते?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

उमेश कोठीकर 13/04/2009 - 06:19
वा! सर्वव्यापी प्राजू;आपण सुचविलेला बदल शिरोधार्य मानून धारण केला आहे. धन्यवाद.

मदनबाण 13/04/2009 - 07:24
नाचत हळूच हात हे गुंफावे स्पंदन प्रेमाचे हृदयी ऐकावे मस्त... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

सँडी 13/04/2009 - 15:41
हृदयी ऐकावे डोळ्यांत बघावे निळुल्या पाण्यात डुंबुनी यावे डुंबता डुंबता श्वास हे दुणावे ओठांचे अमृत ओठांत शिरावे ओठांत शिरूनी गुलाबी जगावे स्वप्नांच्या गर्भाचे बीज तू व्हावे! वाह वाह!! मस्त लिहिलयं. लिहित रहा. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

अविनाशकुलकर्णी 13/04/2009 - 17:08
ओठांत शिरूनी गुलाबी जगावे स्वप्नांच्या गर्भाचे बीज तू व्हावे!...........खुप छान

उमेश कोठीकर 13/04/2009 - 19:14
सगळ्यांचे खूप आभार.

क्रान्ति 13/04/2009 - 20:04
नाजूक, सुन्दर कविता. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

आनंदयात्री 14/04/2009 - 07:16
उमेशराव कविता एक नंबर !! आवडली !! :)