कविता
"गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान"
पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा,
"गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान"
(चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन)
आता मुंबईहून अमेरिकेत जाणारी तिच होकाल मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.
Taxonomy upgrade extras
फोन मेसेज
फोन मेसेज
!*****!
अरे हलो -
फोन नाहीस उचलत...
म्हणजे कामात आहेस.
अजून?
उशीर झाला तरी
जेवण गरम कर.
नाहीतर खाशील तसंच
नेहमीसारखा -
खुडबुडीने माझी
झोप मोडेल म्हणून...
!*****!
प्रभातरंग
पहाट झाली उधळले प्रभातरंग
सुखावले नयन मन आनंदात गुंग
सोनेरी किरणे फुला-पानांत ओसंडे
निसर्गसौंदर्यास कळा सतरावी चढे
नवचैतन्य पहाट विखुरते नवरंग
पाण्यात झळाळे नवसुर्य प्रतिबिंब
पक्षी किलबिलाट छेडे सुर हळुवार
वेलीफुलांना येई तारुण्याची बहार
काळोख भेदे प्रकाश जशी निराशेस आशा
सुर्य विराजमान होई संपवुन अंधारी निशा
टीपः कविता आवडल्यास किंवा न आवडल्यास/ बदल करावेसे किंवा विडंबन करावेसे वाटल्यास जरुर कळवावे/ करावे.
आपला (प्रभातरंगप्रेमी)
मराठमोळा.
Taxonomy upgrade extras
प्रेम म्हणजे ..
प्रेम म्हणजे ..
प्रेम म्हणजे जीव लावणं
फुला सारखा तुझा चेहरा
हातांच्या ओंजळीत घ्यावा
भेटित आपल्या प्रीतीचा
मधुगंध दरवळावा...
तुझ्या भेटित ह्रुदयाची या
पाकळी पाकळी फुलून यावी
परस्परांना जीव लावणं
जीवाला जीव देणं
जीवात जीव आसेतोवर
जीवलग राहाणं
विश्वासाने हातामध्ये
आपला हात देणं
निर्धाराने प्रेमाची शतजन्माची साथ करणं..
संसार एक घर
संसार, म्हणजे एक घर
थोड गुपितच ठेवावं
आरपार दिसू नये
म्हणून पडद्यांनी सजवावं
संसार, म्हणजे एक घर
भावनांना हळूवार टिपावं
अश्रूच्या धारांना
पागोळ्यांत साठवावं
संसार म्हणजे एक घर
प्रेमाच्या पायावर बांधावं
उन्हाच्या झळा साहण्यास
सोशिकतेच छप्पर असावं
संसार म्हणजे एक घर
काचेच्या खि़डक्यांचं असावं
तडा जाऊ नये
म्हणून विश्वासाच कुंपण असावं
संसार म्हणजे एक घर
प्राजक्ताने अंगणी फुलाव
टाकाऊ वस्तुंनाही
तडजोडीने सजवावं.
Taxonomy upgrade extras
वाटा वेगळ्या
गर्द निळाईने रंगले आभाळ
शांत तळ्याकाठी दिशा विसावल्या
हलकेच जरा छेडता वा-याने
पाण्यात तरंग होऊन सांडल्या
सोन्याची झळाळी माखलेली सांज
फुलवित आली प्राजक्तपाकळ्या
घुमे घंटानाद राउळाच्या दारी
दूर डोंगरात झांजाही वाजल्या
काजळे क्षितिज, अंधाराच्या संगे
गूढ, अनामिक सावल्या जागल्या
एका अवघड वळणावरून
झाल्या तुझ्या माझ्या वाटाही वेगळ्या
तुझ्या वाटेवर आतुर फुलांनी
मुलायम गंधपाकळ्या पेरल्या
माझ्या वाटेवर उदास काळोख,
काट्यांचे कुंपण, भयाच्या सावल्या
तुझी वाट साद सुखाची घालते,
उजळीत लाख चांदण्यांच्या कळ्या
माझी वाट घुटमळते एकटी,
जशा पायी मणामणाच्या साखळ्या
मी मराठी!
मराठी तू मर्द गडी
नसांतून मराठी वाहे
नको उपहास साहू
प्रश्न अस्तित्वाचा आहे!
कोणी म्हणे "घाटी साले"
हाण त्यांना खेटराने
महाराष्ट्री मराठीच
कापते का भितीने?
उगीचच इंग्रजाळे
गरज काय सवतीची
लाज वाटते का तुला
थोर माय मराठीची?
सेरेमनी थ्रेड,बर्थडे
सणदेखील इंग्लीश झाले!
दूध असता आईला
भुकटीला भरते आले!
अतिथी हे देव! पण
मान राखा संस्कृतीचा
एकजीव व्हा ना येथे
प्याला दूधसाखरेचा!
शिवछत्रपती कृपा
मराठी "मानाचे" झाले
मर्दा टिकव अस्मिता तू
देव "१०५" बोले!
महाराष्ट्र देश माझा
राज्य हे मराठी आहे
म्हण ताठ गर्जून तू..
होय "मी मराठी आहे...!!"
अनंगरंग
धुंद एकांत हा - तुझ्या सवेच रंगतो
प्रणयाचा पूर ही - र्हुदयी या उधाणतो ।
स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना
श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो ।
उष्ण अधर कापती - रंगती कपोलही
मुक्त कुंतलात या जीव तुझा गुंततो ।
झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे
रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो ।
विखूरले उशीवरी चांदणे अजूनही
नाहूनी प्रीतीत मन मोगराही उमलतो ।
बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली
रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो |
मिसळपाव