जगावे की जगू नये?
हाच खरा प्रश्न आहे
रक्त माझे! श्वास तुझे!
सारखेच उष्ण आहे
का जगू मी? काय माझे?
देवदेखील चोर आहे
कधी येतील घरी बाबा?
मनी मात्र मोर आहे
बालकांचे रक्त सांडे
भयतू! कलीचा घोष आहे
भूक लागे पण तरी
अजब जीवोन्मेष आहे!
पृथ्वी वांझ! पृथ्वी दग्ध!
भविष्य हे घनघोर आहे
तरी फुले जन्मतात
राखेला मोहोर आहे
भ्रांत मन! जाऊ? राहू?
श्वास फक्त अंतर आहे!
आळवितो परमपित्या
सांग काय निरंतर आहे?
ऐकून माझी रुद्ध वाणी
देव बोले! आकाशवाणी!
"अंती सत्या विजय होतो
विजयी जे ते सत्य आहे!
सत्य शाश्वत! सत्य अंतीम
सत्य जीवन! बोध आहे
मृत्यू व्यर्थ! मृत्यू षंढ
जन्म हाच थोर आहे
जन्म ब्रम्ह! जन्म संधी
बाहूत तुझ्या जोर आहे!!"
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1642
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!
"अंती
+१
In reply to "अंती by मदनबाण
खुपच
उमेश
कविता चांगली
आशावादी कविता.