मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनंगरंग

मनीषा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
धुंद एकांत हा - तुझ्या सवेच रंगतो प्रणयाचा पूर ही - र्‍हुदयी या उधाणतो । स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो । उष्ण अधर कापती - रंगती कपोलही मुक्त कुंतलात या जीव तुझा गुंततो । झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो । विखूरले उशीवरी चांदणे अजूनही नाहूनी प्रीतीत मन मोगराही उमलतो । बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो |

वाचने 2501 वाचनखूण प्रतिक्रिया 7

क्रान्ति 14/04/2009 - 16:51
मोहक अनंगरंग. :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

दवबिन्दु 14/04/2009 - 16:55
रंगती कपोलही कपोल म्हंजे गाल का? ते लाजुन लाल होतत म्हणुण तुमी अस लिहलय का?

उमेश कोठीकर 14/04/2009 - 17:10
न्हाउनी प्रीतीत असे पाहिजे का? कविता छान.

संदीप चित्रे 14/04/2009 - 20:17
>> स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो । >> झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो । >> बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो | या ओळी छान जमल्या आहेत.

प्राजु 14/04/2009 - 20:30
झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो । सुरेख! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू 14/04/2009 - 21:51
कविता आवडली. वृत्त/मात्रांकडे योग्य लक्ष दिल्यास गेयबाधा जाणवायची नाही, असे वाटते. (आस्वादक)बेसनलाडू