या गर्द नील नयनी... दाटुन मेघ आले...
या गर्द नील नयनी... !
काही दिवसांपुर्वी प्राजु ने एक कविता पुर्ण करायला सांगितली होती..
मला त्यावर जे सुचले ते मी लिहीलेय..
या गर्द नील नयनी.. दाटून मेघ आले..
का मोर पापण्यांचे.. मिटवून पंख बसले...
क्षण एक का असेना.. आस हिच.. तु दिसावी..
परि प्रिया न आली माझी..ओठांत गीत रुसले.. [१]
सखये स्मृतीत तुझिया.. बावरा भ्रमर मी झालो..
भिरभिरलो तुज शोधाया.. विरहात श्वास तुटले.. [२]
हा मंद धुंद वारा.. अन गंधीत रातराणी...
हा चंद्र हेच तारे... मज छळावयास उरले... [३]
व्याकुळल्या मनाला... आता तुझीच आस...
ओठी तुझेच नांव.... चित्ती तुलाच स्मरले... [४]
-चंद्रशेखर.
वर्गीकरण
क्षण एक का
सह्ह्ही कविता
छान.
खुप छान.
आभार !
मस्त
छान!
छान
आभार !