एकमत
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जिंका हारा पाडा झोडा एकमताने
सत्ता येता लोणी चापू एकमताने
टांगायाची बाकी आहे वेशीवरती
अब्रु लुटूया जत्रेनंतर एकमताने
देश आमचा तरुणाईचा पहा झोपला
म्हातारे पोलाद म्हणवती एकमताने
सत्तेसाठी सोडले पहा कमरेचेही
नागवा म्हणती समोरच्याला एकमताने
सत्तेच्या सर्कशीत नाहि मजा राहिली
विदुषकांनी केला गोंधळ एकमताने
सारे लढती खुर्चीसाठी प्राणपणाने
वार्यावरती देश सोडला एकमताने
तरीही वेड्या आशेने मत देतो आहे
राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने
-ऋषिकेश
वाचने
2899
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
उत्तम !
सारे लढती खुर्चीसाठी प्राणपणाने
वार्यावरती देश सोडला एकमताने
तरीही वेड्या आशेने मत देतो आहे
राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने
फार छान.
-- लिखाळ.
गझल.
देश आमचा तरुणाईचा पहा झोपला
म्हातारे पोलाद म्हणवती एकमताने
सत्तेसाठी सोडले पहा कमरेचेही
नागवा म्हणती समोरच्याला एकमताने
सत्तेच्या सर्कशीत नाहि मजा राहिली
विदुषकांनी केला गोंधळ एकमताने
- हे शेर आणि शेवटचा एक मताने वरील श्लेष खासच.
नेमक्या शब्दात मांडलेले वास्तव..!
सुंदर!!
In reply to सुंदर!! by घाटावरचे भट
हेच म्हणतो...
बिपिन कार्यकर्ते
चाबुक !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
तरीही वेड्या आशेने मत देतो आहे
राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने
ऋष्या, लेका फार सुंदर कविता केली आहेस रे! कौतुक वाटलं तुझं!
जियो...! :)
तात्या.
मस्त! अगदी वास्तववादी आहे गजल.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
लई भारी.....
मस्तच आहे गजल..
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
तरीही वेड्या आशेने मत देतो आहे
राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने
मस्तच आहे!!!
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
तरिही वेड्या आशेने मत देतो आहे
राज्य स्वःताचे चालवेन या एक मताने.
कमालीची वस्तुस्थिती अगदी नेमक्या शब्दांत!
सलाम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
सुरेख! मस्त जमली आहे!
मस्त आहे एकदम...
तरीही वेड्या आशेने मत देतो आहे
राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने
हे जास्त आवडले.
एकमताने प्रतिक्रिया-मत देणार्या सार्यांचे अनेक आभार :)
ऋषिकेश
मोजके शब्द + नेमक्या भावना + लयबद्ध रचना = अप्रतीम काव्य!! :)
खूप सुंदर! शुभेच्छा!
राघव
उत्तम