दैवी दान
लेखनविषय:
वेदना ही आज माझी - अंतरीची साद आहे
देह माझा चंदनी अन चित्ती तुझा नाद आहे ।
जगताना जगले असे मी ध्यास तुझा घेउनी
उमगले अंती आता - श्वास माझा तूच आहे ।
दिवस चालती काळोखाला सांगाती घेउनी
रवी-शशी नभी असता अंधाराचे नाव आहे ।
सतत वर्षती अमृतधारा परोपरी धरेवरी
अंतरी स्मरणांचा धगधगणारा दाह आहे ।
वाटेवर चालता मिळे काटेरीच पखरण ही
रंग गंधी फुलाफुलांचा गाव तर दूर आहे ।
चांदण्यांची शुभ्र फुले - वेचियली मी येथे
भंगलेल्या स्वप्नांचा त्या आज मला शाप आहे ।
डोळ्यांनी माझीया आजही, घात माझा केला
सांगितले सार्यांना की दुः खाचा हा घाव आहे ।
र्हुदयीच्या जखमा अशा अलवार मी त्या जपल्या
बोल कशी लावू ? - मम दैवाचे ते दान आहे ।
वाचने
2045
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
मस्त गजल.
घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
हो नक्की लक्षं देइन.. पहीलाच प्रयत्न होता ..
In reply to हो नक्की by अश्विनि३३७९
चुकुन प्रतिक्रिया प्रतिक्षित झाली..
चुक भुल द्यावी घ्यावी ..
In reply to हो नक्की by अश्विनि३३७९
तुमचा पहिलाच प्रयत्न चांगला आहे ..
लिहित रहा ..
आवडली
मीनल.
:) कविता आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
चांदण्यांची शुभ्र फुले - वेचियली मी येथे
भंगलेल्या स्वप्नांचा त्या आज मला शाप आहे ।
व्वा.छानच... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
मनःपूर्वक आभार !
कविता एकदम मस्त आहे. :)
आवडली खूप.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कविता एकदम मस्त आहे.
मस्त