Skip to main content

एकतारी

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 01/09/2020 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
धपापता ऊर गातसे ललित । हळवे ते सूर जीवघेणे ।। विरहाने चूर ठिणगी विदेही। जाणवतो धूर काळजात ।। वेदनेचा पूर क्षितिज ओलांडे वासुदेव दूर भिजे स्वतः ।। राऊळीं कापूर एकटा झुरतो । ज्याची हुरहूर तोच जाणे ।। चांदण्या फितूर दिसे कृष्णमेघ । वाजे कणसुर एकतारी ।। - अभिजीत
लेखनविषय:

वाचने 2328
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by चौथा कोनाडा

कणसूर म्हणजे योग्य सूर नसलेला. कमीजास्त सूरात लागलेलं वाद्य किंवा गायन. मूळ कवितेत चुकून ऱ्हस्व झाला. खरा दीर्घ हवा होता. हा माझा कणसूरपणा.

राऊळीं कापूर एकटा झुरतो । ज्याची हुरहूर तोच जाणे ।। हे सुरेख!