॥ कृष्णतृष्णा ॥
लेखनविषय:
इंद्रलोकीचे दिव्य फूल ते
द्याल मजला का श्रीहरी।
हट्ट पुरवण्या भामेचा मग
लावला पारिजात दारी ॥
क्षणिक ठरले सुख भामेचे
हरिस प्रिय मी रुक्मिणीहुनी।
गेले ते अवसान गळोनी
सडा पाहता तिच्या अंगणी ॥
प्रासादी ना रमली मीरा
प्रभूभजनी दंग जाहली।
मनी वरोनी गिरीधारिसी
विषप्यालाही सुखे प्याली॥
लावण्यासवे पाहुनी कृष्णा
कुब्जा लपवी शापित याैवन।
हरखुनी गेली उमगे जेव्हा
शाम होता तिजसाठी पण॥
रंगुनीया रंगात साऱ्या
एक झाला रंग अवघा ।
राधा होई का निळी हे
अजुनी न कळे श्रीरंगा॥
कदंबतळी रासलीलेचे
विलोभनीय दृश्य दिसे।
हरेक गोपिकेच्या संगे
कृष्ण दिसे...कृष्ण दिसे॥
वाचने
4806
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
सुंदर
In reply to सुंदर by मिसळलेला काव्यप्रेमी
धन्यवाद
छान
In reply to छान by गणेशा
धन्यवाद
छान कविता
In reply to छान कविता by तुषार काळभोर
धन्यवाद
अहाहा.. किती सुंदर निरुपणासह
In reply to अहाहा.. किती सुंदर निरुपणासह by Bhakti
धन्यवाद भक्ती. :)
मस्त कविता. खूssप आवडली..
सुरेख रचना!
सुंदर काव्य रचना सुरेख काव्य