Skip to main content

कविता

धनी माझं कसं येईना अजून

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/04/2010 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
धनी माझं कसं येईना अजून
दिस हा गेला रात चढली कितीक बसावं सजून धजून वाट पाहूनी डोळं थकलं धनी माझं कसं येईना अजून ||धृ||
रातीचा मी शिणगार केला शेज सजवूनी गजरा माळला शालू नेसूनी तयार झाले कुंकू ल्याले भांगातून ||१|| धनी माझं कसं येईना अजून
सांगून गेलं आठदिस झालं कुठं आसलं कुना ठावं लवकर येतो म्हनलं होतं लढाईतून परतून ||२|| धनी माझं कसं येईना अजून
काळीज माझं चिमनी जसं नाही काही थार्‍यावर फोलपणा हा सजण्याचा न जाई मनातून ||३|| धनी माझं कसं येईना अजून - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०४/२
काव्यरस

(ऐक माझ्या मुला)

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 30/04/2010 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा, अर्थातच ही कविता. ऐक माझ्या मुला, तू जरा, तू जरा गोंधळी, या घरी, शांतता दे जरा उच्च वाणी तुझी रे पिपाण्यापरी बोंबलूनी तु घेशी शिरी या घरा पीरपीऱ्या म्हणू, की म्हणू कट्कट्या त्रास देशी असा उठ्विशी मत्शिरा!! तू हि शाई कशा भिंतिला लावली बर्बटूनी निघे, रंग हा पांढरा टाकुनी फेकुनी वस्तु सर्वाघरी फोडशी आरसा मारुनी पत्थरा कोडगा हासतो निर्लजा कारट्या दांडगा, उंडगा.. तू कसा माजरा झोप की क्षण्भरी श्वास घेतो जरा ऐक माझ्या मुला, ऐक ना तू जरा काय साहू पुता, अंत आला अता दे दया तू मला, जोडतो मी करा -राजेश वाचवा वाचवा वाचवा वाचवा

ऐक माझ्या मुला

लेखक सन्जोप राव यांनी शुक्रवार, 30/04/2010 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी प्रेरणा - पण एक सांगा, सतत दुसर्‍या कुणाच्या तरी प्रकाशात राहाण्याचा आरोप मी सहन का करावा? (अशा वेळी साधारणतः 'आम्ही' हे सर्वनाम वापरण्याची प्रथा आहे.

ऐक माझ्या फुला..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 29/04/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक माझ्या फ़ुला, तू जरा, तू जरा गंधल्या अंतरी, दे मला, आसरा कोवळे रूपडे , नाजुका कोमला गौर हा वर्ण गं, साजिरा गोजिरा आसमानीच गं तू परी लाजरी सावरी, बावरी .. तू कुणी अप्सरा गोड वाणी तुझी गं मरंदापरी तू असे मंजुळा की असे शर्करा! मी अबोली म्हणू, कि म्हणू सायली तू निशीगंध की तू असे मोगरा!! ही निळाई तुझ्या लोचनी दाटली धुंदला रंग हा, लाजवी सागरा पल्लवाचे तुझ्या मेघ, गाती जणू छेडती दादरा त्या खुल्या अंबरा साद तू घातली, चैत्र हुंकारला ऐक माझ्या फ़ुला, ऐक ना तू जरा - प्राजु गालगा, गालगा, गालगा, गालगा
काव्यरस

प्रिया माझी "शहाजहान" ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 29/04/2010 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
ताजमहाल च्या मालकीबद्दल सध्या बराच वादविवाद मिपा वर सुरु आहे पण ताजमहाल अमर प्रेमाचे प्रतिक आहे यात सर्वाचे एकमत आहे. त्यासंबंधी सुचलेला विनोद . प्रिया माझी "शहाजहान" ! ! ! होता बादशहा धनवान ऐसा, " ताज " त्याने निर्मिला. प्रेमवंचित आम्हां गरिबांना कायमचे करण्याचा स्वार्थ त्याने साधला. '' ताज " नाही ना " सदनिका " शक्यही नव्हते "झोपडे " झालो घर जावई गातो आता “ त्या तिथे पलीकडे स्मारक अभिनव, अमर प्रितीचे, माझिया प्रियेचे ( महालासम ) झोपडे “ निरंजन वहाळेकर
काव्यरस

आरसा तिच्या शयन गृहाचा !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 26/04/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
आरसा तिच्या शयन गृहाचा ! ! ! तुझ्या शयन गृहाच्या आरशाची असूया मला न्याहळत असतो तो जरा जास्तच तुला. तूहि तितकीच निलाजरी. नेत्रपल्लवी होता त्यासवे खुदकन गोड गाली हसते, होता नजरा-नजर माझ्यासंगे मात्र लाज वदनी अन नजर तुझी खाली असते. “ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ? आजतागत नाही कळले मला माझ्यापरी सखा प्यारा तुझा अन सख्खा वैरी माझा ! ! ! आसुसलेली नजर त्याची जाण कशी नाही तुला ?

आई

लेखक बरखा यांनी रविवार, 25/04/2010 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
आई ============ अ॑कुरले बीज माझे मम आईच्या पोटी नऊ महिने वाढविले तिने मज आपुल्य गर्भासी नवे जीवन दिले तिने मजला मरण यातना स्वता: सोसुनी तान्हुल्याचे मग लाड किती करती जपती तळ हतावरील फोडा परी तिच्या पदराची पडता छाया डोक्यावरी आभाळही ठे॑गणे होई तिच्या मायेपुढती आईचे हे रुण फेडाया कितीक जन्म अपुरे पडती पण कधीही ती माऊली त्याचे व्याज न मागती. पल्लवी

यादवी किंवा (ती झाली तेव्हा...)

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 25/04/2010 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्याचा इतिहास यादवी-युद्धांनी भरलेला आहे. जे मुद्दे तडजोडीने, सहमतीने, गुण्यागोविंदाने सुटू शकतात अशाविषयी हट्टाग्रही भूमिका घेऊन शस्त्रं उपसायची परंपरा आहे. यात भावाविरुद्ध भाऊ उभा राहातो, मित्राविरुद्ध मित्र पवित्रा घेतो आणि प्रेम विसरून एकमेकांचा गळा घोटायला ते तयार होतात. कित्येक राज्यं, देश अशा आंतर्गत बंडाळ्यांमुळे कमकुवत होऊन परकीय आक्रमणांना बळी पडलेली आहेत. मिपावर मी बऱ्याच लोकांपेक्षा खूप कमी वेळ वावरलो आहे. कोणाला अजून भेटलेलोही नाही. असं असतानाही माझे मिपाशी, तिथल्या लोकांशी ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. मिपाने मला खूप काही दिलेलं आहे.
काव्यरस