मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऐक माझ्या फुला..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ऐक माझ्या फ़ुला, तू जरा, तू जरा गंधल्या अंतरी, दे मला, आसरा कोवळे रूपडे , नाजुका कोमला गौर हा वर्ण गं, साजिरा गोजिरा आसमानीच गं तू परी लाजरी सावरी, बावरी .. तू कुणी अप्सरा गोड वाणी तुझी गं मरंदापरी तू असे मंजुळा की असे शर्करा! मी अबोली म्हणू, कि म्हणू सायली तू निशीगंध की तू असे मोगरा!! ही निळाई तुझ्या लोचनी दाटली धुंदला रंग हा, लाजवी सागरा पल्लवाचे तुझ्या मेघ, गाती जणू छेडती दादरा त्या खुल्या अंबरा साद तू घातली, चैत्र हुंकारला ऐक माझ्या फ़ुला, ऐक ना तू जरा - प्राजु गालगा, गालगा, गालगा, गालगा

वाचने 4256 वाचनखूण प्रतिक्रिया 14

डावखुरा 29/04/2010 - 22:27
ताई तुझ्या नवोन्मेशशालिनी प्रतिभेला सलाम!!! अतिशय सुरेख रचना......अतिशय मनभावन,चपखल,नाजुक...... गंधल्या अंतरी, दे मला, आसरा ------------------------------------------------------------ {गोड वाणी तुझी गं मरंदापरी}प्राजु ईथे मकरंदापरी शब्द आहे का? ------------------------------------------------------------ "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

In reply to by बेसनलाडू

डावखुरा 02/06/2010 - 00:15
बेसनलाडू धन्यवाद माहीती पुरवल्याबद्दल.. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

मिसळभोक्ता 29/04/2010 - 23:01
"रंग माझा तुला, गंध माझा तुला, बोल काहीतरी, बोल माझ्या फुला" ह्या गाण्याच्या चालीत फिट्ट बसते. आणि शब्दही त्या चालीच्या स्वभावाला पूरक आहेत. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

चतुरंग 29/04/2010 - 23:09
शब्द कुठल्यातरी गाण्यासारखे आहेत एवढं जाणवत होतं पण नेमकं हे गाणं आठवत नव्हतं! धन्स मिभो!! कविता छान आहे प्राजू! :) चतुरंग

In reply to by मिसळभोक्ता

मीनल 30/04/2010 - 01:40
खरचं की! त्या चालीत म्हणून पाहिलं .बसत आहे . पण त्या गाण्याची कॉपी नाही वाटत आहे . मीनल. http://myurmee.blogspot.com/

In reply to by मिसळभोक्ता

मेघवेडा 30/04/2010 - 03:39
मला "ही गुलाबी हवा, वेड लावी जिवा" हे गाणं आठवलं! असो. प्राजुतै, नेहमीप्रमाणेच एक अतिशय सुरेख रचना!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

डावखुरा 30/04/2010 - 10:13
कोणी मला "मरंदापरी" चा अर्थ समजवेल का? "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"