Skip to main content

कविता

वंगणबद्ध

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 20/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द वंगणबद्ध ही सकाळ इसबगोल थॅन्क्स हिरव्या मिरच्या गरम मसाला दीर्घपार्ट्या अ‍ॅसिडीटी गरम घशाशी गुरगुर जरा तरी बाटली बूचबंद किंचित कळ बंद दार सुलभ सुलभ अतिआनंद

फ्लोरिडा वॉल्ट डिस्ने पार्क

लेखक मीली यांनी मंगळवार, 20/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा मार्च मध्ये फ्लोरिडा ला जायचा योग आला...म्हणजे आणावा लागला...त्याचे असे झाले कि मार्च मध्ये अमेरिकेमध्ये मुलांना स्प्रिंग ब्रेक असतो. तसे बरेच ब्रेक असतात.तेव्हडेच मुलांना हुंदडायला बरे! म्हटले यावेळी आपण का मागे राहावे!

अरे ! अरे s s s रे ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 19/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अरे ! अरे s s s रे ! ! ! जन्मलो तेव्हांच मृत्यो अरे ! भेट अपुली ठरली असे. यौवानांत मी, अन अचानक, आज तू द्वारी वसे. अधिरता तुज, काय वेडी मिलनाची आपल्या. लोक म्हणतील हाय हाय, मिलनासी आपल्या. . गेले आज विपरीत समयी, खंत ह्याची इतुकी नसे. गेले तुजसवे मी यौवनी शोक याचा सकलां असे. निरंजन वहाळेकर

वैकुंठ

लेखक बाबुराव यांनी रविवार, 18/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय तुकाराम, काल तु सपनात आला अन् म्हणला, चल वैकुंठाला. मी हापकुनच गेलो हातापायाला दरदरुन घाम फुटला. च्यामारी तुक्या, तुला काय सवसारात इंट्रेस नव्हता. तु बरा आन तुव्हा इट्टल बरा. माहं तसं नव्ह रं दादा, पोरासोरायचं शिक्षान, म्हातारा-म्हतरी, त्यायच्या हौशी-मौजी, अजुन लय गोष्टी राह्यला आन तु म्हणतो चल वैकुंठाला. आपल्याच्यानं काय होनार नाय. तुव्ह मी काय ऐकणार नाय. टाळ चिपळ्याच्या आवाजात आरामात झोपलो. पर, माह्याच तसबीरीजोळ माहं गणगोत काहून रडून राह्यलं हे मातर कळत नव्हतं ?

.....घडावे असे काही.....

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 18/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
.....घडावे असे काही..... ------------------------------ घडावे असे काही सुंदर आणि गोड.. वक्षावरी सुटावे माझ्या वेणींचे पेड.. लागावी चाहुल त्याला.. किणकिणत्या कंकणाने.... हलकेच जाग यावी..
काव्यरस

एक गिअर मेला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 18/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एक गिअर मेला एक गिअर मेला. तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? गिअर कधी मरतो का? गिअर तर तुटतो, कंडम होतो. मी म्हणतो तो गिअर मेलाच. असाच एक गिअर होता. परिस्थितीच्या वंगणाने गांजलेला, ओझ्याने पिचत चाललेला. दररोज कितीक फिर फिर फिरणार? कितीक काम करणार? तरीही हा गिअर फिरतच होता. एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे. बैलाच्या मानेवर जसे जू असते तशी त्याच्या मानेवर होती एक क्वार्टर पीन. आपेक्षांची, मागण्यांची, गरजा पुर्ण करवून घेणार्‍यांची. तसा तो काही फार मोठा अन मुख्य गिअर नव्हता त्या गिअर बॉक्स मध्ये. अन त्या गिअरबॉक्सच्या आजूबाजूला असंख्य इतर गिअर बॉक्स होतेच.
काव्यरस

मित्रा ...

लेखक स्वप्निल मन यांनी शनिवार, 17/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी मित्रा तू माझ्याकडून दुखावला जात असतोस, पण कसे समजावू तुला, असं करताना मला किती त्रास होत असतो तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, मित्रा तू तर माझा जीव की प्राण आहेस तुझ्यासाठी त्याग करायला मला काहीच वाटत नाही, कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे तुझ्याशिवाय जगणं ही कल्पनाच असह्य आहे, तू म्हणशील तर आयुष्यावर पाणी सोडायला तयार आहे आप्ल्या मैत्री आड कधीच काही नाही येणार, पण, प्रत्येक संकटाच्या वेळी तू विरू आणि मीच जय होणार

कान्हा रे कान्हा असे काय करी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा रे कान्हा असे काय करी (चाल १): दही विकाया गोपी निघाल्या मथूरेच्या बाजारी वाट अडवून कान्हा बसला म्हणे दही कर द्यावा करी प्रिती पाहूनी कान्हाची आपल्यावरी गोपीका त्या वरवर रागावती लटका लटका नकार देती परी मनी सुखावती वाट अडवूनी कान्हा त्यांची छेड काढी कारण करूनी कान्हा मडके फोडी कान्हा मडके फोडी (चाल बदलून): कान्हा रे कान्हा असे काय करी दुधा दह्याचे मडके असे का फोडी फोडीलेस तर सोडीव मज ती गोडी ||धृ|| विरहाची सवय होत असतांना मला तुझ्याकडे पुन्हा का ओढी? ओढीत असता वस्त्रे न माझे फेडी ||२|| कान्हा रे कान्हा असे काय करी दुधा दह्याचे मडके असे का फोडी ||धृ||
काव्यरस