मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(निजवून बारक्यांना..)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्राजूची स्पर्शून तारकांना.. वाचली आणि आता कवितासंग्रह वगैरे प्रसिद्ध होणार्‍या कवयित्रीला फक्त 'छान आहे', 'आवडली' एवढाच प्रतिसाद कसा द्यायचा बुवा, अशा भिडेखातर मग आमच्या नेहेमीच्या श्टाईलमधे हा प्रतिसाद ;) निजवून बारक्यांना आवरु जरा पसारा कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा!!! घामात नाहलेली, चिकटून जात बंडी घेतो पुन्हा पुसूनी, हा गोलसा नगारा उंडारलो असा की, काया विशाल झाली व्यायाम सोडला अन, देहावरी फुलोरा सॅलडमधून आली, भलतीच खाद्य वेला अवरुद्ध श्वास माझे आणि तुझा गुबारा.. गाण्यात का तुझ्या रे, वर्षाव हा 'हिम्या'चा हटकून रोज देई गर्दभ खडा पहारा काव्यास या कधीचे, भलते उधाण आले 'रंगा' विडंबनाने, केलास घोळ सारा!! चतुरंग

वाचने 4313 वाचनखूण प्रतिक्रिया 20

प्रभो Tue, 04/27/2010 - 01:26
आयचा घो....जबराट.... ___/\___ *तुमच्या विडंबनांचा एक संग्रह प्रकाशीत करावा म्हणतोय..., काय म्हणता रंगाशेठ?? :)

राजेश घासकडवी Tue, 04/27/2010 - 01:49
कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा
तुमच्या लेखणीला काही हाड? वास्तवाच्या स्फोटाने स्वप्नमय जगाचं नाजूक बिलोरी विश्व उध्वस्त करायला लाज नाही वाटत? ही घ्या तुमच्यासाठी रागावलेली स्मायली...X( (ओझेवाहू) राजेश

प्राजु Tue, 04/27/2010 - 01:51
गाण्यात का तुझ्या रे, वर्षाव हा 'हिम्या'चा हटकून रोज देई गर्दभ खडा पहारा अशक्य आहात!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

प्रियाली Tue, 04/27/2010 - 03:55
लय भारी!!! :) पुढील काही विडंबनांसाठी चारा
  • उजवून पोरट्यांना
  • खाजवून डोसक्यांना
  • खादडून खारकांना
  • माजवून मारक्यांना

सन्जोप राव Tue, 04/27/2010 - 06:00
घामात बुडालेले जबरी विडंबन..... सन्जोप राव किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है

मस्त कलंदर Tue, 04/27/2010 - 07:16
उंडारलो असा की, काया विशाल झाली व्यायाम सोडला अन, देहावरी फुलोरा
व्वा व्वा!!! आत्मशोध माहित नाही.. पण देहशोध चांगलाच झालेला दिसतोय... :) थोडा आवरता घ्या हो.. नाहीतर सॅलड हेच कायमचे अन्न होऊन बसेल... बाकी, यावरून 'उदयोन्मुख' फुलोर्‍यांनी प्रेरणा घ्यायला हरकत नाही!!! :P
काव्यास या कधीचे, भलते उधाण आले 'रंगा' विडंबनाने, केलास घोळ सारा!!
कैच्या कैच!!! घोळ कसला यात???? मस्त उधाण आलेय... (अवांतर : हा आज उघडलेला मिपावरचा पहिला नोड... मन कसं मस्त प्रसन्न झालं :) ) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सुधीर काळे Tue, 04/27/2010 - 22:14
झकास. विडंबन खूप आवडले. आता मूळ कविता वाचेन. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

डावखुरा Wed, 04/28/2010 - 00:20
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) (गालावरुन काय फिरवावे बरं??????) (आपल्या प्रतिभेचे वारु चोखुर उधळ्लेत चतुरंग राव......................हहपुवा) "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

निजवून बारक्यांना आवरु जरा पसारा कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा!!! लै भारी......! :) -दिलीप बिरुटे

तिमा Wed, 04/28/2010 - 12:18
उत्तम विडंबन जमणे ही सुध्दा एक कला आहे. येऊ द्या अजून! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

भोचक Wed, 04/28/2010 - 19:19
रंगाशेठ जोरात आहेत. मूळ उत्तम कवितेचे तितकेच उत्तम विडंबन. चांगल्या विडंबनासाठी उत्तम कवितेचाच आधार व्हावा हे याने सिद्ध व्हावे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव