Skip to main content

कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 15/07/2010 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला
अशी ग कशी सोडूनी जाते तू मला | करू मी काय विचारू कसे मी तूला ||धृ|| वाटे जीवन आता हे सारे आले संपुष्टात | नश्वर शरीर हे आत्मा कसा राहील त्यात सांभाळू काय कसे मला न समजेना | शेवटचे भेट मला हे ही बोलवेना ||१|| कधी काळी आठवण जरी माझी आली | नकोस भेटू कसे म्हणू मी त्या वेळी हुरहुर लागे नेहमी माझ्या जीवा | आठवणी जुन्या साधती कावा ||२|| पावसाचे थेंब जेव्हा सोडतात मेघांना | हुरहुर लागते तेव्हा त्यांना तशीच हुरहुर लागली मला तेव्हा | सोडून गेलीस जेव्हा तू मला ||३|| जरी थेंब साथ ढगांची सोडती | ढगांचे सुख एकच की थेंब पिकवतील शेती तसाच मी ही आहे ढगांसारखा | सुखी होशील तू फुलव संसार दुसर्‍याचा ||४|| तुझे ते हसणे अन लाघवी बोलणे | आठवते ते तुझे खिडकीतले उभे रहाणे जेव्हा आता मी जातो घरावरून तुझ्या | खिंडार पडे काळजातल्या घरात माझ्या ||५|| का करित होती चाळे केसांच्या बटांशी | का कवटाळी दिलेला गुलाब उराशी का केला होता तू खुणेचा इशारा | का केला होता माझ्या नावाचा पुकारा ||६|| असेल जेथे तू तेथे सुखी रहा | माझ्या मनाला समजावीतो पहा म्हणून सांगतो मी तुम्हाला| प्रेम केले तर न्या ते शेवटाला ||६|| अशी ग कशी सोडूनी जाते तू मला | करू मी काय विचारू कसे मी तूला ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १५/०७/२०१०
काव्यरस

वाचने 1367
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया