Skip to main content

मैत्रीण

लेखक कमलेश पाटील यांनी बुधवार, 11/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी शाळेत तुझी झाली भेट; एक नवी मैत्रीण म्हणून; जगण्याच्या संकल्पनाही न कळल्या तेव्हा; तुझा हात धरला आधार म्हणून. या माणसांच्या बाजारात; मला सगळंच अनोळखी वाटायचं; तुझं माझं मैत्रीच नातच फक्त; मला माझ हक्काच वाटायचं. तारुण्यातल्या नवथर गोष्टी; आपण एकमेकींना सांगत गेलो; आपल्या मैत्रीच्या विश्वात रमताना; क्षणाक्षणाला वाढत गेलो. सप्तपदी चालताना सुद्धा; माझी नजर तुलाच शोधितं होती; मनात होतो हुरहुर नव्या जोडीदाराची; पण तुझी नजर मात्र आश्वासक होती. रमत गेले मी ससांरात नकळत; तुझ्या पासून अस्तित्वाने मी दूर झाले; पण तुझ्या मैत्रीची ओढ इतकी की; तुझ्या आठवणींचीच मी मैत्रीण झाले. आयुष्याचा या कातरवेळी ; समजलेल्या आयुष्याचे बरेच अर्थ तुला सांगायचेत; जगण्याच्या धावपळीत राहिलेले बरेच क्षण; फक्त तुझ्या मैत्रीत जगायचेत.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1585
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया