Skip to main content

कविता

कविता — मिसळपाववरील मराठी कवितांचा विशाल संग्रह. प्रेम, निसर्ग, समाज, विरह आणि जीवनानुभव यांवरच्या हजारो मराठी कविता, गझल, मुक्तक आणि चारोळ्या येथे वाचा व आपली कविताही प्रकाशित करा.

लेवू दे निळाई..

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 19/12/2010 04:47 या दिवशी प्रकाशित केले.

झेपावत्या धरेला गगना कवेत घेई
अंगांग तृप्त कर तू मज लेवू दे निळाई

आधार मीच होते दुबळ्या जगास सार्य़ा
माझ्या मनातूनी का पण शोधते निवारा
जेव्हा तुला पहाते हरपून भान जाई

देतोस रंग ओले माझ्या सुन्या मनाला
क्षितिजास रेखिसी अन सौभाग्यरूप माला
घे जिंकूनी मला तू अपुल्या गृहास नेई

- स्वानंद

काव्यरस

बंडूच्या स्वप्नातच येते -

लेखक विदेश यांनी शनिवार, 18/12/2010 22:29 या दिवशी प्रकाशित केले.

बंडूच्या स्वप्नातच येते स्वर्गामधुनी छान परी
झोपेमधला हीरो बंडू मौजमजा धम्माल करी ।१।

खात ‘ बुढ्ढीका बाल ’ शंभर बंडू होतो लालीलाल
चोखत लॉलीपॉप शंभर बंडू करतो पहा कमाल ।२।

ट्वेंटी-ट्वेंटित बंडू ऐटित ठोकी शतके चार
बळी दहाही घेऊन करतो शत्रूला बेजार ।३।

खुशालचेंडू मिळवी बंडू गुण शंभरपैकी शंभर
निकालात ना कधीच सोडी तो अपुला पहिला नंबर ।४।

ऑलिंपीक वा एशियाड ती असो कोणतीही स्पर्धा
प्रतिस्पर्ध्यांची उडवी बंडू क्षणात भलती त्रेधा ।५।

बंडू वरचढ ठरतो नेहमी - खेळ असो मारामारी
कुस्तीमध्ये डाव बंडुचा धोबीपछाडच भारी ।६।

मध्यरात्र..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 17/12/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.

मध्यरात्री कधीतरी येते जाग
कशी कुणास ठाऊक ...?
मी बघत बसतो खिडकीतून
डोळे किलकिले करून
माझ्या खिडकीतून दिसणारे आभाळ
नि खिडकीतून दिसणारे हे पारिजातकाचे झाड
मध्यरात्री कधी जाग आली की
झाडावर ओठंगलेला चंद्र दिसतो
माझ्या सुरक्षित अंतरावरून हे दृश्य सुंदर मस्त दिसतेय !!
चीडीचीप्प रात्र नि हे जीवघेणे झाड
ध्यान लावून बसलेले....

बायको मस्त गाढ झोपलेली
नि मी असा बेचैन
मी उठतो नि किचन मध्ये जातो
सकाळी काहीच नसणारे झुरळे
आता मस्त फिरत असतात
अन्न-कण शोध मोहिमेवर ....
कोठे लपतात नि कोठून येतात अचानक
कुणास ठाऊक.. ?

काव्यरस

पुन्हा तुझीच वाट पहात आहे

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 16/12/2010 20:35 या दिवशी प्रकाशित केले.

तू उशीरा येण्याची आता
सख्या सवय झाली आहे
तरी ही टेबलावर जेवण
अन दारावर डोळे ठेवून
मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे

अश्यातच ... आयुष्याच्या पानावरती
नव्यानेच लिहिलेले काही क्षण
मन पटलावर पुन्हा एकदा
थैमान घालू लागले..

अन विचारांच्या वादळात
अनेक अनुत्तरीत प्रश्न
पुन्हा एकदा ह्रदयाच्या दारावर
अस्त व्यस्त पणे धडकू लागले

का रे सख्या असा करतोस ?
माझाच असताना तू
प्रेम विसरुन फ़क्त क्षणीक सुखांसाठी
मज अवेळी बिलगतोस

युगलगीतः मला वाजतीया थंडी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/12/2010 14:28 या दिवशी प्रकाशित केले.

युगलगीतः मला वाजतीया थंडी

तो:

ए, मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल
अग मला वाजतीया थंडी ||धृ||

ती:

आथरून बिथरून उगा काय नको,
तुमच्या अंगात हाय उबदार बंडी

तो:

गारगार वारं सुटलया मरनाचं
हुडहुडी भरलीया माझ्या अंगात
असला गारठा नाय पाहिला जल्मात कधी
अग मला वाजतीया थंडी,
तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||१||

आथरून बिथरून उगा काय नको,
तुमच्या अंगात हाय उबदार बंडी

तो:

काव्यरस

जख्ख अशी म्हातारी !!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 16/12/2010 13:59 या दिवशी प्रकाशित केले.

जख्ख अशी म्हातारी
कोयत्याच्या आकारची !!
कुणास ठाऊक किती वय झालय तिचे ?
हाडाच्या सापळ्यावर लोंबणारी कातडी
बुबुळावरची राखाडी रंगाची साय
खूप पावसाळे डोक्यावरून गेलेत
सहस्त्रचंद्र होऊन सुद्धा उलटून गेलाय काळ ....
किती कुणास ठाऊक ?
आता आताशी म्हातारी कुणाच्याच नसते गणतीत
पोरेबाळे आपल्याच फिकिरीत
नातवाच्या काळजीत खंगून जातात
म्हातारीच लोढणे गळ्यात बांधून
कधी सुटतेय म्हातारी
वाट बघत बसतात ...!!
वाट बघायची म्हणजे भयंकर कंटाळवाणे ...
थकून जातात गात्रे नि गात्रे ....
म्हातारी मात्र असते जिवंत उद्याची वाट पाहत

काव्यरस

जख्ख अशी म्हातारी !!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 16/12/2010 13:31 या दिवशी प्रकाशित केले.

जख्ख अशी म्हातारी
कोयत्याच्या आकारची !!
कुणास ठाऊक किती वय झालय तिचे ?
हाडाच्या सापळ्यावर लोंबणारी कातडी
बुबुळावरची राखाडी रंगाची साय
खूप पावसाळे डोक्यावरून गेलेत
सहस्त्रचंद्र होऊन सुद्धा उलटून गेलाय काळ ....
किती कुणास ठाऊक ?
आता आताशी म्हातारी कुणाच्याच नसते गणतीत
पोरेबाळे आपल्याच फिकिरीत
नातवाच्या काळजीत खंगून जातात
म्हातारीच लोढणे गळ्यात बांधून
कधी सुटतेय म्हातारी
वाट बघत बसतात ...!!
वाट बघायची म्हणजे भयंकर कंटाळवाणे ...
थकून जातात गात्रे नि गात्रे ....
म्हातारी मात्र असते जिवंत उद्याची वाट पाहत

काव्यरस

प्रवास मी एकटीच करते... (गीत)

लेखक गणेशा यांनी बुधवार, 15/12/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.

अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरतीमाते
जाणिव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते...

गुलाम जीवन खितपत मळले
नाव माझी धारेत डळमळे
कुठली नाही दिशाच ठावी
गांव कोठले मला न कळले

भाव भावनांचा बाजारी
एकटीच मी दारोदारी
विरक्त जीवन ईश्वर कोठे
भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी

अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरतीमाते
जाणिव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते...

- शब्दमेघ ... (स्त्री.. भावनांचा प्रवास मधुन )

काव्यरस

जे प्रेम करून लग्न करतात ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 15/12/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.

जेव्हा तो प्रेम करतो
तेव्हा त्याच्या खिशात चंद्र असतो
जेव्हा ती प्रेम करते
तेव्हा तिच्या मनात एक स्वप्न असते
दहा पेंशाचे फुटाणे खाता खाता
दोघांचे एक गाणे असते

चला इथपर्यंत पाऊलवाट सापडली
स्वर्ग आता हाकेवर आहे
आमचे प्रेमतर
सात जन्माची ठेव आहे !!

तो तिच्या डोळ्यात बघतो
एक छान गाणे गातो
ती डोळे मिटते
त्याच्या गाण्यात हरवून जाते

काव्यरस

काय करू मी बाई सांगा तरी काही

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/12/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
काय करू मी बाई सांगा तरी काही
काय करू मी बाई सांगा तरी काही
रातीला मजला झोपच येत नाही ||धृ||

डोळं र्‍हाती माझं सताड उघडं
कानं कानोसा घेती कवाडाकडं
आता तुमी येनार, लगेच तुमी येनार
मनाला वाटं
पर तुमी काय येतच न्हायी
काय करू मी बाई सांगा तरी काही ||१||

परवा म्हनं तुमी मी येतो उद्याच्याला
कालचा दिस खाडा झाला, आजतरी कुठं आला
एकलीच बसते विचार करते
असं छळू नका
डोळं लावून तुमची वाट मी पाही
काय करू मी बाई सांगा तरी काही ||१||

काव्यरस