मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काय करू मी बाई सांगा तरी काही

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
काय करू मी बाई सांगा तरी काही
काय करू मी बाई सांगा तरी काही रातीला मजला झोपच येत नाही ||धृ|| डोळं र्‍हाती माझं सताड उघडं कानं कानोसा घेती कवाडाकडं आता तुमी येनार, लगेच तुमी येनार मनाला वाटं पर तुमी काय येतच न्हायी काय करू मी बाई सांगा तरी काही ||१|| परवा म्हनं तुमी मी येतो उद्याच्याला कालचा दिस खाडा झाला, आजतरी कुठं आला एकलीच बसते विचार करते असं छळू नका डोळं लावून तुमची वाट मी पाही काय करू मी बाई सांगा तरी काही ||१|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०

वाचने 1302 वाचनखूण प्रतिक्रिया 1

गणेशा 15/12/2010 - 13:33
काय करू मी बाई सांगा तरी काही रातीला मजला झोपच येत नाही छान सुरुवात ... अजुन एखादे कडवे हवे होते का ?