Skip to main content

कविता

स्त्री सूक्त

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 08/03/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
राणीचे राज्य ब्रिटीश आणि आमच्यात एक गोष्ट अगदी सेम आहे प्रत्येक घरात एक राणी आहे आणि कुटूंबाचे तिच्यावर प्रेम आहे *** चिमुकल्या फुलांसाठी अहंकाराची बोचक कुसळे बाण होण्याआधी छाटून टाका नाजूक चिमुकल्या फुलांसाठी धनुष्य टाकून खाली वाका *** सक्षमीकरण शब्द अवघड वाटला तरी सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ पुरूषातील कोमल स्त्री जागवा आणि प्रत्येक स्त्रीमधील पुरुषार्थ ***

गण: देव गौरीनंदन आधी वंदुया

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 08/03/2011 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
गण: देव गौरीनंदन आधी वंदुया (चाल पारंपरीक)
देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| रसीक जमले आम्हांसमोरी तुझेच रूप जणू शेंदरी उशीर नका लावू देवा झडकरी या या शुभ कार्याची सुरूवात करूया ||१|| रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी तुज पुजीतो कलावंत आम्ही मंगल कार्याआधी गणाला गावूया शुभ कार्याची सुरूवात करूया ||२|| देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०३/२०११
काव्यरस

शरण...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 07/03/2011 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
सांग सखे कसा आवरू मी बुडण्याचा मोह खुणावत आहेत मजला तुझ्या नयनीचे डोह नको लवून पहाटे अशी वेचू ... सखे... फुले मन उगाच बांधती मग... तुझ्या झाडी ... माझे झुले केली सगळी तयारी मनी एकच हा ध्यास कधी करायचा सांग... सात पावलांचा प्रवास सांग कधी पडतील हव्याहव्याश्या त्या गाठी ... अन माझ्या नावाभोवती तुझ्या नावाची ग मिठी आता नको नाही म्हणू, आता नको मागे फिरू, आलो तुला मी शरण माझ्याशिवाय तुझ्या जगण्यात, आपसूक माझे मरण ... माझे मरण

श्रीशिवरायाचा जयकार

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 07/03/2011 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीशिवरायाचा जयकार सह्याद्रीवर घुमतो अजून तुझ्या शौर्याचा हुंकार ... श्वासाश्वासातून निघतो श्रीशिवरायाचा जयकार ... म्लेंच्छांनी घातले घाव घाव मातृभूमी वरी .. परदास्याच्या अंधःकारातून पेटला स्वातंत्र्याचा रवी ... घेऊनी रामदासी मंत्र गर्जला हा नृसिंह असा ... दुमदूमला आसमंत सारा थरथरल्या दाही दिशा ... मावळे मराठे मर्द झुंजले अर्पुनी प्राण ... रोवले छातीत मोघलांच्या तेजस्वी भगवे निशाण ... तासिले कडे अभेद्य घडविले दुर्ग बेलाग ... सळसळती मनगटे मराठी अन् समशेर ओकते आग ... हिंदवी स्वराज्याचा ज्यानी थाटला सं
काव्यरस

अन्तर्नाद

लेखक पूनम १ यांनी सोमवार, 07/03/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
रातीच्या अंधारात, खुणावती वेणुची साद, सुरांनी तिच्या जागला , जागला अन्तर्नाद, धुक्याची ही वाट नेते, कालिंदीच्या तीरी, वाट पाहतो ग तिथे , माझा श्रीहरी तो श्याम सावळा, मी बावरी ग राधा, पाहण्या श्रुन्गार चोरुन, चांद उगवला आधा, गळले देहाचे बन्धन, खुण अंतरीची पटे, श्याम झाला राधा, राधा श्यामच वाटे, माझी गोरी ही काया, श्याम रंगात न्हाली, सावळ्या हरीच्या स्पर्शाने, राधा सावळी झाली.

date

लेखक अभिषेक९ यांनी सोमवार, 07/03/2011 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
फोनवर मंजूळ आवाजाने हळुवारपणे संध्याकाळी date ठरली मी वेळेवर तयारीत पोहचलो ती तयारच होती मला पाहताच गोssड हसली अनं माझा हात हातात घेतला माझा हात तसाच हातात ठेऊन तिने तिचे नेत्र मिटले विचारात कुठेतरी हरवून गेली ते सुरेख नेत्र उघडून म्हणाली 'तुझे डोळे बघू!' खुपवेळ ती माझ्या अनं मी तिच्या डोळ्यात बघत होतो एकटक, निरखून !! परत तिने माझा हात हातात घेतला हळूच घड्याळ बघून हसली.. अचानक माझ्या छातीलाच तिने कान लावले छाती धडधडली, श्वास वेगावला पण ती शांतपणे माझे चुकलेले ठोके ऐकत होती अगदी मन लावून!! एक निश्वास सोडून ती तिच्या जागेवर बसली पेन हातात घेऊन गुलाबी कागदावर लिहू लागली मी धडधडतचं होतो धक्यात
काव्यरस

मी घर बदललंय ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 07/03/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
दर आठवड्याला ठरल्याप्रमाणे देवळात गेलो .... अन ह्या २ ओळी सुचल्या ..... देवभोळा नसण्याची permission मी देवाकडूनच घेतली आहे ... अन आमच एकमेकाला status reporting weekly आहे ... पुढे त्याचा विस्तार एका वेगळ्याच कवितेत झाला .... कुठे गेली माझ्या घरावरची तुझी सावली... कुठे गेला तो मेघ, कुठे गेली ती कृपावृष्टी ... आता सगळच सरलंय .. मला काळात नाही देवा ...

मशाल क्रांतीची...

लेखक अभिषेक९ यांनी रविवार, 06/03/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
उडाला भडका वाजवा डंका पेटवा लंका पेटली मशाल क्रांतीची सर्वत्र विखारी नाग धुमसली आंतरिक आग भडकला सार्वजनिक राग पेटली मशाल क्रांतीची स्फुरले तारुण्य सळसळले रक्त हादरले मदांध तख्त पेटली मशाल क्रांतीची काव्य केलेने शस्त्राने रक्त सांडली लेखणीने भूमीस लाल-अभिषेक पेटली मशाल क्रांतीची धरणी दुभंगली आकाश विस्फारले भास्कराने डोळे मिटले पेटली मशाल क्रांतीची सृष्टी-पुत्रांनीचं पुकारला प्रती-सृष्टीचा उष:काल भास्कराने पुनश्च: डोळे उघडले आकाश सारे मुक्त झाले हसले डोंगर आनंदिली सरिता पेटली मशाल क्रांतीची आता, तुचं तुझा चित्रकार तुचं तुझ
काव्यरस