Skip to main content

अन्तर्नाद

लेखक पूनम १ यांनी सोमवार, 07/03/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
रातीच्या अंधारात, खुणावती वेणुची साद, सुरांनी तिच्या जागला , जागला अन्तर्नाद, धुक्याची ही वाट नेते, कालिंदीच्या तीरी, वाट पाहतो ग तिथे , माझा श्रीहरी तो श्याम सावळा, मी बावरी ग राधा, पाहण्या श्रुन्गार चोरुन, चांद उगवला आधा, गळले देहाचे बन्धन, खुण अंतरीची पटे, श्याम झाला राधा, राधा श्यामच वाटे, माझी गोरी ही काया, श्याम रंगात न्हाली, सावळ्या हरीच्या स्पर्शाने, राधा सावळी झाली.
लेखनविषय:

वाचने 879
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अत्यंत मोजक्या शब्दात, आशय छान व्यक्त झालाय.... आवडलीय..... :-)